बांबू लागवडीसाठी केंद्राची शेतकऱ्यांना मदत

डॉ. भागवत कराड : पर्यावरण रक्षणाच्या पहिल्या कार्यशाळेचे उदघाटन
Bhagwat-Karad
Bhagwat-Karadsakal
Updated on

नाशिक : निसर्गाचा कोप होऊ नये. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्यात बांबू लागवडीसह वस्तू उत्पादनाची चळवळ उभी राहत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे मदत करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे दिली. ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी‘ आणि जिओलाईफ ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे बांबू लागवडीद्वारे पर्यावरण रक्षणाचा जागर करणाऱ्या २१ जिल्ह्यांत २१ कार्यशाळा होणार आहेत. त्यातील पहिल्या कार्यशाळेचे उदघाटन मविप्र संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

Bhagwat-Karad
भोंदूबाबाचा आईसह तिन मुलींवर बलात्कार | Nashik

राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, स्वागताध्यक्ष आमदार डॉ. राहूल आहेर, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, कोनबँकचे संचालक संजीव करपे, जिओलाईफचे अध्यक्ष विनोद लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित त्रिपाठी, द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले, सनदी लेखापाल कृष्णा काबरा, एसआयआयएलसी चे सहव्यवस्थापक अमोल बिरारी आदी उपस्थित होते. डॉ. कराड म्हणाले, की शेतकऱ्यांना बांबू लागवडीसोबत त्यापासून वस्तू निर्मितीसाठी किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा लोनच्या माध्यमातून मदत करण्यात येईल.

Bhagwat-Karad
Nashik Firing: RPIचे प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार

ठळक नोंदी

बांबू लागवडीद्वारे पर्यावरण रक्षणाच्या जागरासाठी ‘सकाळ’सह शेतकऱ्यांचा ‘ॲग्रोवन’ सोबत असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे पटेल यांनी सांगताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला

गोदावरी कायम वाहती रहावी म्हणून काठावरील गावांमधील पडीक जमिनीत बांबू लागवड केली जाईल, असे पटेल यांनी जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()