Ashadhi Wari: तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंग! संत निवृत्तीनाथ पालखीच्या पहिल्या रिंगणाचा दातलीत सोहळा

Ringan
Ringanesakal
Updated on

तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंग

गेला शिणवटा सारा, मेघ झाले पांडुरंग....

नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात...

अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात...

उक्तीची अनुभूती बुधवारी दि.7 सिन्नर तालुक्यातील दातली येथे झालेल्या गोल रिंगण सोहळ्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलाचे अभंग गात पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या पावलांनी या रिंगण सोहळ्यातून अनोख्या चैतन्याची ऊर्जा घेतली. (ceremony of first ringan of sant Nivrittinath Palakhi in Datli nashik news)

esakal
रिंगण
रिंगण esakal
esakal

संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे पंढरपूरच्या वाटेवरील पहिले गोल रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली येथे खंबाळे रस्त्यालगत बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता पार पडले. सकाळी लोणारवाडी येथील मुक्काम हलवल्यावर सिन्नरकरांचे आदरातिथ्य स्वीकारत हजारो पालखी सोबतचे हजारो वारकरी कुंदेवाडी येथे दुपारच्या जेवणासाठी थांबले.

तेथून खंबाळे येथील मुक्कामाकडे जात असताना दातलीत गोल रिंगण सोहळा पार पडला. पालखी मार्गावर गेल्या सहा ते सात वर्षांपासून सदर रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो. मधली दोन वर्षे कोरोना मुळे वारी झाली नाही.

मात्र गेल्या वर्षीपासून वारी पूर्ववत सुरू झाली. आजच्या रिंगण सोहळ्याला वारकऱ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला होता. तर हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी दातलीच्या दिशेने येणारे रस्ते माणसांच्या गर्दीने भरून वाहत होते.

सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रिंगणाला सुरुवात झाली. पालखी सोबत असलेल्या दिंडीतील विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, झेंडेकरी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला स्वतंत्र गटाने गोलाकार उभ्या राहिल्या.

पालखी व दिंडय़ा रिंगणात दाखल झाल्यावर मृदंग व टाळांच्या गजरात हजारोंच्या मुखातून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा नामघोष करीत ठेका धरण्यात आला. झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला या क्रमाने सर्वजण रिंगणातून धावले. सर्वात नाथांच्या पालखीसोबत असलेला मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण केली.

रिंगण संपल्यावर रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, एकीबेकी हे खेळ टाळ-मृदुंगाच्या गजरात सुरू होते. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून पुढच्या प्रवासासाठी नवी ऊर्जा घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ringan
Ashadhi Wari 2023 : गोदाघाटावर वारकऱ्यांची मांदियाळी; मंदिरात दर्शनासाठी लोटली गर्दी
esakal

पालखीचे मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे, मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी, आचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, एकनाथ महाराज गोळेसर, कैलास महाराज तांबे, संजय महाराज धोंगडे, चैतन्य महाराज नागरे, सागर महाराज दौंड, चंद्रकांत दादा आहेर , किशोर महाराज खरात, कृष्णा महाराज कमानकर, जालिंदर महाराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व दातली ग्रामस्थांच्या सहकार्याने सोहळा पार पडला.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम, सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे, वावीचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 70 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.

पालखी सोहळा प्रमुख नारायण महाराज मुठाळ, संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्रंबकेश्वरचे अध्यक्ष निलेश गाढवे, सचिव सोमनाथ घोटेकर, विश्वस्त अमर केंद्रे, माधवदास राठी, श्रीपाद महाराज कुलकर्णी, नवनाथ महाराज गांगुर्डे, राहुल महाराज साळुंखे, कांचनताई जगताप, नाशिक रोड - देवळालीच्या आमदार सरोज अहिरे,

प्रांत अधिकारी एकनाथ बंगाळे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे, युवानेते उदय सांगळे, सिमंतिनी कोकाटे आदी मान्यवर रिंगण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.

esakal
Ringan
Ashadhi wari 2023 : पाऊले डिजिटली चालती पंढरीची वाट ! ऍप देणार पंढरीच्या वारीची अनुभूती

रिंगण सोहळ्याची क्षणचित्रे

रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी तीस ते पस्तीस हजार भाविकांची उपस्थिती.

संत निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत एकूण 43 दिंड्या, मानाच्या चार दिंड्या रथाच्या पुढे तर उर्वरित दिंड्या रथाच्या पाठीमागून क्रमाने.

सिन्नर तालुक्यातील गोंदेचे मूळ रहिवासी असलेले संजय तांबे रा. माडसांगवी यांच्या 'राजा' या आश्वाला दिंडीत व रिंगणात अग्रभागी राहण्याचा मान.

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या पालखी सोहळ्याचे पारंपारिक चोपदार राजाभाऊ चोपदार व रामभाऊ चोपदार हे दातली येथील रिंगण सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. माऊलींचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन केले.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात कर्जत तालुक्यातील धांडे वस्ती येथे दिनांक 20 जून रोजी उभे रिंगण पार पडेल तर तिसरे शेवटचे गोल रिंगण दिनांक 25 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील करकंभ येथे होईल.

Ringan
Ashadhi Wari 2023 : 4 हजार सायकलिस्ट घालणार पंढरपुरात ‘रिंगण’! 2 दिवसांत ‘सायकल वारी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.