CET Exam Registration : सीईटी नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ; राहिलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी

व्‍यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. या सीईटी परीक्षांच्‍या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.
CET registration deadline extended till Monday nashik news
CET registration deadline extended till Monday nashik newsesakal
Updated on

CET Exam Registration : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. या सीईटी परीक्षांच्‍या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.

त्‍यानुसार सोमवार (ता. १२)पर्यंत ही मुदतवाढ दिलेली असून, या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची नोंदणी करता येणार आहे. (CET registration deadline extended till Monday nashik news)

सीईटी सेलमार्फत सर्व सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. साधारणतः मार्च महिन्‍यात या सीईटी परीक्षा घेतल्‍या जाणार आहेत. जानेवारीअखेरपर्यंत परीक्षा नोंदणीची मुदत दिलेली होती. मात्र अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सीईटी सेलने यापूर्वी प्रथम मुदतवाढ दिलेली होती.

ही वाढीव मुदत मंगळवारी (ता. ६) संपुष्टात येत असताना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. त्‍यानुसार सोमवार (ता. १२)पर्यंतच्‍या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना आपल्‍या शैक्षणिक आर्हतेनुसार विविध अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे.

CET registration deadline extended till Monday nashik news
CET Exam : सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित

...या अभ्यासक्रमांना मुदतवाढ

सोमवार (ता. १२)पर्यंत सीईटी परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेल्‍या अभ्यासक्रमांमध्ये बी.एड.-एम.एड. (तीन वर्षे इंटिग्रेटेड), एम.एड., एम.पीएड., बी.एड. (जनरल व स्‍पेशल), बी.पी.एड. या शिक्षणशास्‍त्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

यासोबतच एमबीए, एम.आर्क., एमसीए या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा, हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील पदवी व पदव्‍युत्तर अभ्यासक्रम, बी. डिझाइन या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाकरिता होणाऱ्या सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीसाठी ही वाढीव मुदत लागू राहील.

‘एलएलबी’साठी शनिवारपर्यंत

पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमासाठी पहिल्‍या टप्प्‍यातील वाढीव मुदत शनिवार (ता. १०)पर्यंत आहे. पुन्‍हा मुदतवाढीची प्रतीक्षा न करता, सध्या मिळालेल्‍या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन सीईटी सेलतर्फे केले आहे.

CET registration deadline extended till Monday nashik news
CET Exam : ‘सेट’साठी करा आजच अर्ज; ऑनलाइन प्रक्रिया सुरू; ३१ जानेवारीची अंतिम मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()