Nashik News: चाचडगाव टोलनाक्याला वरदहस्त कुणाचा? राज्यमंत्र्यांच्या नावे उलटसुलट चर्चा

Toll Collection file photo
Toll Collection file photoeakal
Updated on

Nashik News : स्थानिकांना टोलपासून सुटका मिळावी यासाठी संघर्ष असो की टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरीचा विषय असो चाचडगाव टोलनाका कायम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (Chachadgaon toll booth in midst of controversy nashik)

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही या टोलनाक्यावर अडविल्याने वाद झाला होता. त्यावेळी प्रशासनाकडून टोलनाका अजित पवार यांचा असल्याचे सांगितले होते. त्यावेळी श्री. झिरवाळ यांनी थेट अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.

अजित पवार यांनी टोल प्रशासनाला चुकीच्या पद्धतीने नाव न वापरण्याबाबत तंबी दिली होती. पोलिसही दाखल झाले होते. झिरवाळांनी टोलप्रशासनाला तंबी दिली होती.

मागील आठवड्यात पुन्हा टोलनाक्यावर ट्रकचालक, मालक संघटना व टोलनाका प्रशासनात वाद झाला. याबाबत परस्पर विरोधी गुन्हेही दाखल झाले. यात पुन्हा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. टोलनाक्याला वरदहस्त कोणाचा. अशी चर्चा यानिमित्त सुरू आहे.

दिंडोरी तालुक्यात ढकांबे येथील टोलनाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर हा टोलनाका बंद झाला. पांडाणे येथेही टोलनाका प्रस्तावित आहे. तेथील बांधकाम पूर्ण झाले असले, तरीही प्रशासकीय पूर्तता न झाल्यामुळे तो अजून सुरू झालेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Toll Collection file photo
Nashik: ‘नको ओवाळणी, नको खाऊ, जुनीच पेन्शन हवी भाऊ’! आरोग्य सेवा महिला कर्मचाऱ्यांनी सरकारला पाठविल्या राख्या

लवकरच तो टोलनाका सुरू होणार असून, चाचडगाव येथील टोलनाक्याचे टेंडर घेतलेली कंपनीच पांडाणे टोलनाका घेण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. तीनपैकी सध्या सुरू असलेला चाचडगाव टोलनाका एकमेव आहे.

त्या टोलनाक्यावरील वाद कायम चर्चेचे विषय ठरत आहेत. परिसरातील गावांना टोलपासून सुट द्यावी, या मागणीसाठी गावांनी मोठे प्रयत्न केले.

मात्र, त्यात यश आले नाही. जिल्ह्यातील बहुतेक टोलनाक्यावर परिसरातील गावांना टोलपासून सुट दिली जाते. मग या टोलनाक्यावरील प्रशासन सहकार्य का करत नाही, असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.

Toll Collection file photo
Inflation News: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! तूरडाळीच्या दरात विक्रमी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.