NISAKA Protest : ड्रायपोर्टसाठी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्री झालेल्या १०५ एकर जमीन विक्रीतून उपलब्ध झालेल्या १०८ कोटी रकमेतून कारखाना कामगारांची थकीत ८१ कोटींची देणी द्यावी, या मागणीसाठी कामगारांनी आज भाऊसाहेबनगर येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेसमोर साखळी उपोषणास सुरवात केली. (Chain hunger strike to collect dues of Naka workers nashik news)
संघटनेचे अध्यक्ष विलास आंधळे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक, कारखान्याचे अवसायक कामगारांची थकीत देणे देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिल्यामुळे आता मालक जिल्हा बँक आहे, असे अवसायक म्हणतात.
थकीत देणे मिळविण्यासाठी कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नसून आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात रास्ता रोको व निफाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
कारखाना कामगारांची फसवणूक करणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला धडा शिकवणार असल्याने कारखान्याचा खरा मालक कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारखाना चालवायला घेताना कामगारांची थकीत देणी व सेवाशर्ती याबाबत त्रिपक्षीय करार करणे कायद्याने बंधनकारक होते; परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक व बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी कराराबाबत कामगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
कामगार संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सोमनाथ गडाख, सरचिटणीस पाटील यांनी कामगारांची थकीत दिली व कामगारांचे अन्य प्रश्न याबाबत माहिती देऊन साखळी उपोषण व आंदोलनाची भूमिका विशद केली. कामगार संघटनेची जिल्हा बँक व कारखाना प्रशासनास सहकार्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी नवनाथ गायकवाड, बाळासाहेब बागस्कर, सुभाष झोमन, उत्तम गायकवाड आदींसह शेकडो कामगार उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.