Nashik Crime News: चैनस्नॅचिंग करणारा पोलीस सेवेतून बडतर्फ; आयुक्तांचा दणका

Chain Snatcher dismissedfrom police service by nashik cp crime news
Chain Snatcher dismissedfrom police service by nashik cp crime news
Updated on

Nashik Crime News: त्र्यंबकरोडवरील जिल्हाधिकारी बंगल्यालगतच्या रस्त्यावर दिवाळीच्या दिवशी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत खेचून पोबारा करणारा पोलीस कर्मचारीच असल्याचे निष्पन्न झाले होते.

नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयित योगेश शंकर लोंढे या पाेलीस कर्मचार्यास पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.

लोंढे याच्यावर यापूर्वीही निलंबनाची कारवाई झालेली आहे. गेल्या वर्षभरात दोघांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे. (Chain Snatcher dismissedfrom police service by nashik cp crime news)

चैनस्नॅचिंगचा गुन्हा दाखल असलेला योगेश लोंढे हा शहर पोलिस सेवेत शिपाई या पदावर कार्यरत होता. सध्या त्याची पोलीस मुख्यालयात नेमणूक होती. यादरम्यानच त्याने दिवाळीच्या दिवशी अल्पवयीन मित्राच्या मदतीने पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

लोंंढे २०१८ मध्ये मुंबई नाका पोलिस ठाण्यात नेमणुकीला असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. त्याला नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत निलंबितही करण्यात आले. त्यानंतर सेवेत दाखल झाल्यानंतर, २०२० मध्ये त्याच्याविरोधात सिन्नर पोलिसांत विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल आहे.

त्यामुळे त्याला पुन्हा ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत निलंबित करण्यात आले. निलंबन काळानंतर त्याला पोलिस मुख्यालयात नेमण्यात आले होते. त्याच्या सततच्या गैरवर्तनासह गुन्हेगारी कृत्याची पोलिस आयुक्त कर्णिक यांनी गंभीर दखल घेत त्याच्यावर सेवा बडतर्फीची कारवाई केली आहे.

Chain Snatcher dismissedfrom police service by nashik cp crime news
Nashik Crime News: पत्नीच्या खुनानंतर पतीने उचलले टोकाचे पाऊल; पत्नीच्या चारित्र्यावर संशय

वर्षात दोघांवर कारवाई

गेल्या वर्षभरात शहर आयुक्तालयातील दोघा पोलीस कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आलेले आहे. मयूर अपरसिंह हजारी याने कारचालकाला अडवून त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळले होते. याप्रकरणी तक्रार दाखल होताच, तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एप्रिल २०२३ मध्ये हजारी यास बडतर्फ केले.

तोही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादग्रस्त राहिला होता. तरीही त्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली आहे. तर, योगेश लोंढे हा वर्षभरात दुसरा पोलीस कर्मचारी आहे, ज्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Chain Snatcher dismissedfrom police service by nashik cp crime news
Nashik Crime News: अट्टल चैनस्नॅचरला केले गजाआड; 12 लाखांचा ऐवज जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.