Chain Snatching : राजरोसपणे सौभाग्यचंलेणे ओरबाडणे सुरूच; पोलिसांचे मात्र हातावर हात

chain snatching latest crime news
chain snatching latest crime newsesakal
Updated on

नाशिक : खुटवडनगर परिसरातील वृंदावननगर येथे शनिवारी (ता.१६) ज्या ठिकाणी महिलेची सोन्याची पोत खेचली होती, त्याच ठिकाणी मंगळवारी (ता. १८) रात्री पुन्हा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी किराणा दुकानातून सामान घेऊन घरी परतणाऱ्या महिलेची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली. राजरोसपणे चोरटे महिलांच्या सौभाग्यच लेणे ओरबाडून नेले जात असून, गेल्या १८ दिवसांतील ही ११ वी घटना असून, ढिम्म शहर पोलिस यंत्रणा सोनसाखळी चोरट्यांसमोर निष्फळ ठरली आहे. (chain snatching crime continues in vrundavan nagar Nashik Latest Crime News)

chain snatching latest crime news
Nashik Crime News : शहरात वाहनचोरट्यांचा सुळसुळाट; कारसह 5 दुचाकींची चोरी

प्रतिभा हेमंत मेने (रा. खुटवडनगर, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १८) रात्री सव्वाआठच्या सुमारास त्या किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. दुकानातून परत घराकडे परतत असताना, त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे संशयित आले आणि त्यांना काही कळायच्या आधीच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संशयिताने मेने यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून पोबारा केला.

याप्रकरणी अंबड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे हे तपास करीत आहेत. दरम्यान, याच ठिकाणी शनिवारी (ता. १५) रात्री पुष्पा देवरे यांची ४० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली होती. दिवसाआड एकाच चौकात घटना घडूनही संशयित सोनसाखळी चोरट्यांना आळा घालण्यात अपयश येणाऱ्या ढिम्म शहर पोलिसांविरोधात संताप व्यक्त होतो आहे.

chain snatching latest crime news
Fake Medical Certificate Case : 'ते' 16 पोलिस कर्मचारी ‘Not Reachable’

१८ दिवसांतील अकरावी घटना

ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये शहरात सोनसाखळी आणि दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, त्यांच्यासमोर शहर पोलिसांनी नांग्याच टाकल्याचे दिसून येत आहे. गेल्या १८ दिवसांमध्ये शहरात जबरी चोरीच्या १७ गुन्हे घडले आहेत. तर, यामध्ये ११ घटनांमध्ये महिलांच्या सौभाग्याचे लेणे सोनसाखळी चोरट्यांनी ओरबाडून नेले आहे.

chain snatching latest crime news
Nashik Crime News : विनयभंग, अत्याचार प्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.