Lakshmi Pujan 2023: लक्ष्मीपूजनाने दीपोत्सवात अवतरले चैतन्य! घराघरांत, व्यवसाय, उद्योगांत मुहूर्तावर लक्ष्मीपूजन

lakshmi pujan
lakshmi pujanesakal
Updated on

Lakshmi Pujan 2023 : ‘आरोग्यम धनसंपदा’ प्रार्थना करत नाशिककरांचा दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोचला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

घरोघरी, व्यापारी, उद्योगांच्या ठिकाणी रविवारी (ता. १२) मुहूर्त साधत विधिवत लक्ष्मी-कुबेर पूजन पार पडले. सोनपावलांनी लक्ष्मीचे आगमन झाल्याने सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. (Chaitanya incarnates in Deepotsava with Lakshmi Pujan on Muhurta in homes businesses industries nashik)

आरोग्य अन् मांगल्य प्राप्तीसाठी दिवाळीत घरोघरी, तसेच व्यापारी अन् उद्योगांच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केले जाते. हिंदू संस्कृतीनुसार दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व असते.

यंदा नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले. तरी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सकाळी आठपासून असल्याने सर्वत्र पूजेची लगबग होती.

घरोघरी, व्यापारी, उद्योगांच्या ठिकाणी भक्तिभावाने विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. या वेळी गणेशपूजन, कलशपूजन, सोने-चांदीची लक्ष्मी प्रतिमा, धन-कुबेर पूजन, सरस्वती रूपाने वहीपूजन विधिवत करण्यात आले.

दरम्यान, केरसुणीचे लक्ष्मी रूपात पूजन करण्यात आले. केरसुणीने दारिद्र्य नष्ट होते, अशी मान्यात आहे. पूजनानंतर धणे-गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, मिष्टान्न यांसह कुळातील परंपरेनुसार पुरणपोळी, सांजोरीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

मनोभावे पूजन करत भाविकांनी आरती करून पूजेची सांगता केली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने नागरिकांनी घरासमोर अंगणात, तसेच व्यापाऱ्यांतर्फे दुकानांसमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

lakshmi pujan
Lakshmi Pujan 2023: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत 20 टक्क्यांची वाढ! व्यावसायिकांमध्ये उत्साह

यांसह फुल-हारांची सजावट करण्यात आली. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत लक्ष्मीपूजनात सहभाग घेत सुखसमृद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना केली.

शहरात उत्साह अन् भक्तिभावाने मुहूर्तावर विधिवत लक्ष्मीपूजन पार पडले. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मीपूजनाला शहरात चैतन्य अन् उत्साहाच वातावरण पाहायला मिळाले.

चोपडीपूजन; व्यापाराच्या आर्थिक नव वर्षाला सुरवात

लक्ष्मीपूजन विशेषतः व्यापारीवर्गासाठी महत्त्वाचा दिवस असतो. दिवाळीत परंपरेनुसार बलिप्रतिपदा अर्थात पाडव्यापासून व्यापारीवर्गाचे आर्थिक वर्ष सुरू होते.

त्यामुळे व्यापारी व्यापार उद्योगाच्या ठिकाणी वर्षभरातील आर्थिक व्यवहार मांडण्यासाठी लागणाऱ्या हिशेबाच्या वह्या, लेखणी, तिजोरी, यंत्रसामग्री व संगणक याचे विधिवत पूजन करतात. यासह लक्ष्मी, कुबेर, सोने- चांदी, धन- धान्य पूजन करतात. हे पूजन घरोघरी देखील केले जाते.

lakshmi pujan
Diwali 2023: लक्ष दीप हे उजळले घरी! बॉलिवूड कलाकारांनी अशी साजरी केली दिवाळी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.