Gajanan Maharaj Paduka: श्री गजानन महाराजांच्‍या चैतन्‍य पादुका नाशिकमध्ये; भाविकांना संपर्काचे आवाहन

श्री स्वामी समर्थ १८५६ मध्ये अक्कलकोट येथे आले, व २२ वर्षे तेथे राहिले. त्यावेळी अक्कलकोट जरी संस्थानचे गाव असले तरी अगदी लहान म्हणून ओळखले जायचे.
Gajanan Maharaj and Agnihotra
Gajanan Maharaj and Agnihotra esakal
Updated on

Gajanan Maharaj Paduka : श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर श्री बाळप्पा मठ आणि विश्‍व फाउंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट यांच्‍यातर्फे अक्‍कलकोटचे परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्‍या चैतन्‍य पादुकांचा नाशिक दौरा आयोजित केला आहे. (Chaitanya Paduka tour of Sri Gajanan Maharaj organized to Nashik news)

या ३० डिसेंबरपासून २ जानेवारी या कालावधीदरम्‍यान हा दौरा होत आहे. जगद्गुरू भगवान दत्तात्रेय यांच्या गुरुपरंपरेतील आणि अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार स्थापन केलेल्‍या गुरूपीठावरील उत्तराधिकारी, सत्यधर्म प्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्‍या चैतन्‍य पादुकांचे दर्शन घेण्याची, पाद्यपूजनाची संधी नाशिककर भाविकांना मिळणार आहे.

याही वर्षी घरोघरी पाद्यपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना आपल्या घरी श्री चैतन्य पादुकांच्या पूजनासाठी आमंत्रण द्यायचे असेल त्यांनी स्‍वयंसेवकांशी संपर्क साधावा. परमसद्गुरू वयाच्या विसाव्या वर्षी श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) यांच्या गुरुगादीचे प्रमुख झाले. श्री स्वामी समर्थ १८५६ मध्ये अक्कलकोट येथे आले, व २२ वर्षे तेथे राहिले.

त्यावेळी अक्कलकोट जरी संस्थानचे गाव असले तरी अगदी लहान म्हणून ओळखले जायचे. तथापि, स्वामींच्या दर्शनासाठी ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर आदी ख्यातनाम मंडळी येत असतं. श्री स्वामी समर्थांनी आपल्या निर्वाण समयी आपले प्रिय शिष्य श्री बाळप्पा यांना सांगितले होते, की मी जरी अंतर्धान पावलो तरी तुझ्या रूपाने व तुझ्यानंतर येणाऱ्या उत्तराधिकाऱ्यांच्या रूपाने मीच कार्य करणार आहे.

Gajanan Maharaj and Agnihotra
Mahanubhav Sammelan: श्री चक्रधर स्वामींच्या जन्मस्थळासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल : शरद ढोले

श्री स्वामी समर्थांच्या गादीवर परमसद्गुरू आल्यानंतर आपल्या सर्वश्रेष्ठ सद्गुरूंच्या आज्ञेनुसार वेदांच्या पुनरुज्जीवन करण्याची प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा म्हणजे सर्वांसाठी वेद खुले झाले, सर्वांना वेदांचा अधिकार दिला गेला. वेदांचे सारस्वरुप यज्ञ, दान, तप, कर्म व स्वाध्याय रुपी पंचसाधन मार्गाची शिकवण समस्त मनवमात्राला दिली.

अग्‍निहोत्र यज्ञानचे प्रवर्तन वायुमंडळ शुद्धीसाठी

वायुमंडळ शुध्दीसाठी सहज सुलभ अशा अग्निहोत्र यज्ञाचे प्रवर्तन केले. ते अत्यंत तपस्वी असे जीवन जगले. त्यांनी सूर्योदय ते सूर्यास्त उभे राहून तपसाधना केली. ऊन, पाऊस वा कसेही हवामान असो, ते नेहमी अनवाणीच जात असतं.

ते कधीही भारताच्या बाहेर गेले नाहीत, कधीही जाहीर भाषण प्रवचन दिले नाही. तथापि, देशात विदेशात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. वेदांचा आचारधर्म सर्वांसाठी आहे हे त्यांनी पुनः स्पष्ट केले. जात/पात,पंथ भेद यांच्या पैलपार त्यांनी विचार मांडले. आज शंभरावर देशात पंचसाधन मार्ग व अग्निहोत्राचा संदेश पोचला आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क

गौरव दीक्षित (९९२३७२५००१)

पल्लवी जोशी (८६६८२९३६७१)

नीलेश जोशी (९८२२७९०५०८)

Gajanan Maharaj and Agnihotra
Nashik News : बाबाजींच्या कृपेने मिळाली जगण्याची ‘दृष्टी’; धर्मसोहळ्यात सलीम पठाणने उलगडला जीवनपट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.