Chaitra Pournima : येवला आगाराला चैत्रपोर्णिमा पावली तब्बल 10 लाखांना!

MSRTC Bus service at wani gad
MSRTC Bus service at wani gadesakal
Updated on

Chaitra Pournima : येथील एस. टी. आगाराला सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सव यंदा भरभरून पावला आहे. यात्रा कालावधीत सवलतीसह विविध फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ९७ हजार १२६ रुपये तर सवलतीविना ६ लाख ५५ हजार ४५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

कोरोना व एसटी संपाच्या सावटातून बाहेर आल्यानंतर आलेली चैत्र पोर्णिमा यात्रा एसटीला पावली. (Chaitra Pournima revenue of 10 lakhs in Yevla Agara msrtc depot nashik news)

जिल्ह्यातील १४ पैकी येवला आगाराने उत्पन्न वाढीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. आगारप्रमुख प्रवीण हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने हे यश मिळवले आहे. आगाराच्या या यशाबद्दल विभाग नियंत्रक अरुण सिया व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

येथील आगाराने व्यवस्थित नियोजन करून १० बसच्या माध्यमातून ३० मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत सप्तशृंगगड मार्गावर ७७९ फेऱ्या करत १२ हजार ४४० किलोमीटरचा टप्पा पार केला.

चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त गडावर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी परिवहन महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांनी आपल्या लालपरीवर विश्वास दाखवत जादा गाड्यांचा लाभ घेत यात्रा पूर्ण केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

MSRTC Bus service at wani gad
Nandurbar News : भुषा गावात प्रथमच पोहचली वीज! लख्ख प्रकाशामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

कर्मचाऱ्यांनी देखील मेहनतीने साथ दिल्याने जवळपास ६४ रुपये प्रति किलोमीटर उत्पन्न मिळवण्यात आगार यशस्वी ठरला आहे. दरम्यान प्रवाशांना चांगली सेवा दिली, की ते एस. टी. ला प्राधान्य देतातच.

यात्रा काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांचा एकसंघपणा व एकत्रित नियोजनामुळे हे यश मिळाले आहे, प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी सुखरूप पोचवण्यासाठी आगार कायम तत्पर असेल असे आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी सांगितले.

MSRTC Bus service at wani gad
Nashik : शिक्षण उपसंचालक कार्यालयाला 20 एप्रिलला ठोकणार कुलूप; माध्यमिक शिक्षण संघाचे प्रशासनाला पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.