वणी (जि. नाशिक) : आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला गुरूवार (ता.३०) पासून सुरवात होत असून तो ६ एप्रिल २०२३ पर्यत चालेल. यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठक होऊन विविध सूचना देण्यात आल्या.
येत्या ४ एप्रिलला श्री भगवतीच्या मंदिरावर किर्तीध्वज फडकविण्यात येणार आहे. (Chaitrotsav of Adimaya Saptashrungad from 30th March nashik news)
यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय स्तरावर विविध शासकीय, अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व विश्वस्त संस्थेच्या विविध विभागांची सयुक्तिक आढाव सभा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सप्तशृंगगडावरील चिंतन हॉलमध्ये झालेल्या नियोजन सभेदरम्यान विविध विभाग व त्यांचे तालुका, जिल्हा व विभागस्तरावरील विविध अधिकारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थांसमवेत सकारात्मक चर्चा विनिमय करून यशस्वीपणे यात्रोत्सव आयोजनाबाबत सूचना दिल्या.
शासकीय व निमशासकीय विभागातील पदाधिकारींनी यात्रेसंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती तसेच संभाव्य आवश्यकतेबाबतचे तपशील सादर केले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
किर्तीध्वज ४ एप्रिलला फडकणार
आदिमायेच्या चैत्रोत्सवातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस असलेल्या चतुर्देशी अर्थात चावदसच्या दिवशी मंगळवारी (ता.४) श्री भगवतीच्या किर्तीध्वजाचे विधिवत पूजन होऊन मानकरी गवळी परिवारातील प्रतिनिधींच्या माध्यमातून श्री भगवतीच्या पर्वत शिखरावर त्याच दिवशी रात्री बाराला ध्वजारोहण होणार आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन विश्वस्त संस्थेतर्फे करण्यात आले.
बैठकीस विश्वस्त ॲड. ललित निकम, पोलिस निरीक्षक समाधान नांगरे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त संस्थचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण,
उपविभागीय रुग्णालय अधीक्षक डॉ. असिक शेख, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक ए. बी. सोनार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गो. वि. कासार, विभागीय नियंत्रक अ. भ. सिप्पा, आगार व्यवस्थापक हेमंत पगार,
सार्वजनिक विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए. जी. गायधनी, श्रीमती ए. एस. पवार, राज्य वीज महामंडळ अधिकारी पी. एस. उगलमुगले, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत, सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.