Nashik News: चेक पोस्ट बंद न झाल्यास 2 पासून देशात ‘चक्का जाम’!

border check post
border check postesakal
Updated on

Nashik News : केंद्र सरकारने संपूर्ण देशात जीएसटी लागू केलेला असताना देशातील १७ हून अधिक राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद झालेल्या नाहीत. राज्यातील चेक पोस्ट बंद न केल्यास २ ऑक्टोबरपासून देशभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने दिला आहे.

या बंदला नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला असून या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती ट्रान्स्पोर्ट असोसिशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी दिली. (Chakka jam in country from 2 if check post not closed Nashik News)

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढसह विविध राज्यांमध्ये अद्याप बॉर्डर चेक पोस्ट सुरू आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनंतरही महाराष्ट्रात ३४ पैकी २८ चेक पोस्ट अद्यापही सुरू आहेत. टोल नाक्यांवर अवैध पद्धतीने लूट करण्यात येते.

वाहतूकदारांमध्ये प्रचंड रोष आहे. एकीकडे केंद्र सरकारने इज ऑफ डूइंग बिझनेस अंतर्गत सगळीकडे डिजिटलायजेशन केले आहे. तरी देखील वाहतूक दारांची रस्त्यावर काम करत असताना अडवणूक व लूट केली जाते.

border check post
Nashik : भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा! नांदगावच्या दत्तराज छाजेड यांच्या निर्णयाने खळबळ

वाहतूकदारांना आवश्यक त्या कुठल्याही सुविधा चालकांना त्यांच्या आरोग्याची किंवा आरामाची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. टोल प्लाझा अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था मोठ खड्डे असूनही टोल मात्र आकारला जातो.

या विरोधात देशातील संघटना एकटवल्या असून २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास चक्का जाम आंदोलनाचा इशारा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने दिला आहे.

border check post
Nashik Rain Update: मालेगावात दमदार पावसाची हजेरी! रब्बीच्या आशा पल्लवित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.