Nashik : रामकुंड नव्हे रामतीर्थ!; गोदेच्या पाण्याचा ‘BOD' 5 खाली आणण्याचे आव्हान

Godavari river
Godavari riveresakal
Updated on

नाशिक : नाशिककरांची जीवनदायिनी गोदावरी नदीच्या पाण्याचा ‘बीओडी' (बायोलॉजीकल ऑक्सिजन डिमांड) पाचच्या आणण्याचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे ‘रामतीर्थ'चे महत्त्व अबाधित राखण्याची जबाबदारी पालक संस्था म्हणून महापालिकेला पार पाडावी लागणार आहे. (challenge of bringing down BOD of godavari river water below 5 Nashik Latest Marathi News)

त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर उगम पावणाऱ्या गोदावरीचा नाशिक शहरातून १९ किलोमीटरचा प्रवास आहे. प्रवासाच्या टप्प्यात प्रवाहाच्या वर, मध्य व खालचा प्रवाह असे तीनस्तर असून ‘रामतीर्थ'वरून ९० अंशात दक्षिणेकडे वळताना विनाअडथळा प्रवास होत असला, तरी पाण्याची गुणवत्ता मात्र खालावली आहे. ‘रामतीर्थ'च्या पाण्याची गुणवत्ता साधारण असली, तरी ‘नमामि गोदा‘ प्रकल्पाच्या माध्यमातून नदीत मिसळणाऱ्या नाल्यांना मुख्य मलजल वाहिन्यांना जोडून ‘रामतीर्थ'चे महत्त्व कायम ठेवावे लागणार आहे.

नाशिकचे महत्त्व गोदावरी नदी मुळे आहे. त्यामुळे हे महत्त्व चिरंतन राखण्याची जबाबदारी नाशिककरांची आहे. दरवर्षी लाखो भाविक गोदावरीमध्ये डुबकी मारण्यासाठी येतात. त्यात अहिल्यादेवी होळकर पूल ते मोदकेश्‍वरपर्यंतच्या ‘रामतीर्था‘त स्नानाचे महत्त्व अधिक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘रामतीर्था‘तील स्नानासाठी कोट्यवधी भाविक दाखल होतात. त्यामुळे ‘रामतीर्था‘त डुबकी मारण्याचे महत्त्व जितके, तितकेच ‘रामतीर्था‘तून वाहणारे पाणी स्वच्छ राहणे गरजेचे आहे. ‘रामतीर्था‘त पोचणाऱ्या पाण्याची गुणवत्ता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या निकषानुसार तपासताना प्रवाहाच्या वर, मध्य प्रवाह या दोन टप्प्यात परिस्थिती बरी असल्याचे दिसते.

तरी खालच्या प्रवाहाच्या टप्प्यात मात्र धोकादायक पातळी ओलांडली आहे. खालच्या प्रवाहाच्या टप्प्यात जैविक प्राणवायू मागणी अर्थात ‘बीओडी‘ २४ मिलिग्रॅम नोंदविला गेला आहे. वरच्या व मध्यप्रवाहात ‘बीओडी‘ चे प्रमाण सहा नोंदवण्यात आले आहे. गोदावरीच्या वरच्या व मध्यप्रवाहाचे पाणी ‘रामतीर्था‘त पोहोचते. दोन्ही प्रवाहात ‘बीओडी‘चे प्रमाण सर्वसाधारण आहे. त्यामुळे सध्या तरी फारसा धोका नाही. मात्र प्रवाहाच्या या दोन्ही टप्प्यात पाचच्या आत ‘बीओडी‘ आणणे आवश्यक आहे. खालच्या टप्प्यात गोदावरी नदीत मिसळणारे नाले मलनिःसारण केंद्राला जोडणाऱ्या मुख्य वाहिन्यांना जोडून गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडावे लागेल.

Godavari river
Nashik : बेशिस्त वाहनचालकांना हिसका; 10 लाखांचा दंड वसूल

"गोदावरीच्या वरच्या प्रवाहात रामवाडीकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी वळवण्याचे काम पूर्ण होत आले आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. उर्वरित नाले अन्य मार्गाने मलनिस्सारण केंद्राकडे वळवण्यासाठी ‘नमामि गोदा‘ प्रकल्पात समावेश केला जाणार आहे."

- शिवाजी चव्हाणके (अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा व मलनिःसारण विभाग, नाशिक महापालिका)

गोदावरीत मिसळणारे २५ नाले

- गंगापूर गाव

- बारदान फाटा

- सोमेश्वर

- चिखली

- आनंदवल्ली

- सुयोजित उद्यानजवळ

- चव्हाण कॉलनी

- चोपडा

- जोशीवाडा

- मल्हारखान

- मानूर

- आसाराम बापू आश्रमजवळ

- कुसुमाग्रज उद्यानजवळ

- सरस्वती

- नागझरी

- कन्नमवार पुलाजवळ

- जाधव बंगला

- अरुणा नदी

- वाघाडी नदी

- केवडी वन

- मानूर गाव

- पिंपळपट्टी

- पवारवाडी

- गंधारवाडी

- लेंडी

मलनिःस्सारण केंद्रांची क्षमता

(आकडे दशलक्ष लिटरमध्ये)

- तपोवन एक- ७८

- तपोवन दोन- ५२

- आगर टाकळी एक- ७०

- आगरटाकळी दोन- ४०

- चेहडी एक- २०

- चेहडी दोन- २२

- पंचक एक- २१

- पंचक दोन- ७.५०

- पंचक तीन-३२

- पिंपळगाव खांब-३२

- गंगापूर-१८

Godavari river
Measles Infection : नाशिकच्या बालकांची तूर्त गोवरमधून सुटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.