Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 1175 योजना पूर्ण करण्याचे आव्हान

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 1175 योजना पूर्ण करण्याचे आव्हान
esakal
Updated on

Jal Jeevan Mission : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांपैकी आतापर्यंत जवळपास २०० योजनांच्या जलवाहिन्या, विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. (challenge of completing 1175 schemes of Jal Jeevan mission nashik news)

त्यातील ४० योजनांची जलचाचणी होऊन संबंधित गावांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मंजूर १,२२२ योजना पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च २०२४ आहे. आतापर्यंत केवळ ४० योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामुळे साडेतीन महिन्यांत १,१७५ पूर्ण करण्याचे आवाहन विभागासमोर आहे.

केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळाने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी होत असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १,२२२ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आतापर्यंत २०० योजना पूर्ण असून, त्यातील १६० योजनांची जलचाचणी अद्याप झालेली नाही.

१,०२२ हून अधिक योजनांची कामे सुरू आहेत. यातील ३५ योजनांचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले जात आहे. उर्वरित सर्व योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत संपण्यास केवळ साडेतीन महिने शिल्लक आहेत. या कालावधीत उर्वरित योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कसरत करावी लागणार आहे.

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 1175 योजना पूर्ण करण्याचे आव्हान
Jal Jeevan Mission: जलजीवनच्या फायलींचा प्रवास पुन्हा लांबणार; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

हे आहेत अडथळे

प्रशासकीय मान्यता होऊनही वेळेत निविदा न निघणे, कामांचे अंदाजपत्रक तयार करताना जलस्त्रोतांसाठी जागा निश्चित न करणे, जागेवर जाऊन सर्वेक्षण न करणे आदींमुळे कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदारांना या बाबींची नव्याने पूर्तता करण्यात अवधी गेल्याने कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर काम सुरू होण्यातही खूप वेळ गेला.

एकाच ठेकेदाराकडे ५० पेक्षा अधिक कामे असल्याने अडचण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एक ॲप तयार केले असून, प्रत्येक कामाचे फोटो, व्हिडिओ त्यावर टाकणे बंधनकारक केल्याने ठेकेदारांची वेळात देयके मिळत नाही, त्रयस्थ संस्थेच्या अहवालाशिवाय देयक न देण्याची प्रशासनाची भूमिकेमुळे योजनांचे वेग मंदावला आहे.

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 1175 योजना पूर्ण करण्याचे आव्हान
Nashik NCP News: राष्ट्रवादीचे नितीन मोहिते समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.