Champashashthi 2023: आधी चांदोरी,नंतर जेजुरी! चांदोरीत आज भाविकांची मांदियाळी; गोदावरी काठी धार्मिक कार्यक्रम

Champashashthi 2023 crowd of devotees today in Chandori Religious events along Godavari shore
Champashashthi 2023 crowd of devotees today in Chandori Religious events along Godavari shoreesakal
Updated on

चांदोरी : गोदावरी नदी द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे ज्या ठिकाणी प्रवाहित होते, ते गाव म्हणजे चंद्रावती. चंद्रावतीचे पुढे अपभ्रंश चांदोरी नाव पडले.

अख्या महाराष्ट्राचे कुलदैवत, तसेच प्रतिजेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या चांदोरी येथील गोदाकाठी असणारे पुरातन खंडेराव मंदिर श्रद्धास्थान आहे.

जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर पहिल्यांदा या मंदिरात दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे ‘आधी चांदोरी मग जेजुरी’ किंवा ‘ज्याने पहिली नाही जेजुरी, त्याने पाहावी चांदोरी’, अशी परंपरा चांदोरीसह उत्तर महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून पाळली जाते. (Champashashthi 2023 crowd of devotees today in Chandori Religious events along Godavari shore)

ज्याने पहिली नाही जेजुरी, त्याने पाहावी चांदोरी, अशी परंपरा चांदोरीसह उत्तर महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून पाळली जाते.
ज्याने पहिली नाही जेजुरी, त्याने पाहावी चांदोरी, अशी परंपरा चांदोरीसह उत्तर महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून पाळली जाते. esakal

चांदोरीचे जहागीरदार सरदार देवराव महादेव हिंगणे यांचे सातवे वंशज पुष्करबाबा हिंगणे यांनी सांगितले, की देव खंडोबा बानूचे माहेर असलेल्या चंदनापुरीला जाताना चांदोरी येथे गोदावरी काठी मुक्कामी थांबले.

माझे पणजोबा गावचे सरदार नानासाहेब जहागीरदार यांना दृष्टांत दिला व माझ्या मुक्कामाच्या जागी मंदिर बांध. मंदिर बांधायला घेतले, त्या ठिकाणी स्वयंभू पिंडी जेजुरी येथे आहे त्याप्रमाणे प्रकट झाली. त्यामुळे हे स्थान खंडोबाचा पदस्पर्शाने पुनीत झाल्याचे सांगितले जाते.

वर्षभरात अनेक उत्सव होतात. चांदोरी येथून अनेक वर्षांपासून जेजुरीस पायी भाविक दरवर्षी जातात. माघ पौर्णिमेला दोन दिवस यात्रा भरते. या दिवशी परंपरेने बारागाड्या ओढल्या जातात.

खंडोबाचे भक्त (कै.) चंद्रकांत गडाख यांना बारागाड्या ओढण्याचा, तर मंदिरातील इतर पूजाविधी करण्याची जबाबदारी शिवाचे उपासक म्हणून गुरव कुटुंबियांची आहे. नीलकंठ शिंदे व त्यांचे कुटुंबीय सेवेची परंपरा पार पाडत आहे.

दिंडोरी, निफाड आदी गावांतील भक्त जेजुरीला जाताना काठीची भेट आणि दर्शन चांदोरीला घडवतात, ही परंपरा अव्याहत सुरू आहे.

Champashashthi 2023 crowd of devotees today in Chandori Religious events along Godavari shore
Champashashthi 2023: चंपाषष्ठीसाठी बानूबाईची चंदनपुरी सजली! श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरावर रोषणाई

याबाबत मंदिराचे उपासक नीलकंठ शिंदे यांनी सांगितले, की खंडोबाचे मंदिर पवित्र गोदावरी नदीकाठी असल्याने त्याला अधिक मान्यता आहे. स्वयंभू लिंग आहे. बाहेर हेगडीप्रधानांची मूर्ती आहे. दीपमाळ आहे.

चंपाषष्ठीला मंदिरात चांदोरीचे ग्रामस्थ घरातील देव्हाऱ्यातील देव भेटीसाठी या मंदिरात आणतात. या दिवशी पहाटेपासूनच सायंकाळपर्यंत भाविकांची मांदियाळी असते.

गोदाकाठी असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार १९८० च्या दरम्यान करून भंडाऱ्याचा पिवळा रंग दिल्याने मंदिर खूप आकर्षक दिसते.

यामुळे राज्य सरकारने तीर्थक्षेत्र गटाचा ‘ब’ दर्जा दिला आहे. चंपाषष्ठी व माघी पौर्णिमेला येथील खंडेराव मंदिरात जलाभिषेक करत दिंडोरी, चांदवड व निफाड तालुक्यांतील भाविक कावडने चांदोरी येथून पाणी घेऊन जातात.

Champashashthi 2023 crowd of devotees today in Chandori Religious events along Godavari shore
Nashik News: चणकापूरचे पहिले आवर्तन 15 जानेवारीनंतर; 52 पाणीपुरवठा योजनांच्या गावांना मिळणार दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()