Chandrakant Dada Patil : उच्चशिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रशाळा व अभ्यासकेंद्र महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर तयार करता येतील का, याबाबतचा प्रस्ताव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तयार करावा.
व संबंधित विभागाला पाठवावा. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. (Chandrakant Dada Patil statement deprived of school education should be taught free nashik)
मुंबईमध्ये मंत्रालयात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्याबरोबर शुक्रवारी (ता. १) झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मुक्त विद्यापीठाची आगामी वाटचाल, येणाऱ्या अडचणी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत मंत्री पाटील यांनी माहिती घेत सूचना दिल्या.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. उच्चशिक्षणात व्यावसायिक, उपयोजित व कौशल्याधिष्ठित शिक्षणक्रमांचे जिल्हा केंद्रावार आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करावेत, अशी अपेक्षाही मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
बैठकीप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या विषयांवर झाली चर्चा...
नवीन शिक्षणक्रमांना मान्यता, स्कूल ऑफ ऑनलाइन लर्निंग, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे जिल्हा केंद्र सुरू करणे, विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत चर्चा झाली.
तसेच, केंद्रीय स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव, पूर्वतयारी शिक्षणक्रम, कृषी पदवी व उद्यान पदवी शिक्षणक्रम, शैक्षणिक सुविधा, जिल्हा केंद्र समन्वयक, जिल्हा केंद्रप्रमुख मानधन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, आरोग्यमित्र, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.