Gurumauli Annasaheb More : आज एकंदरीत सर्व जगभर अत्यंत विचित्र, अस्वस्थ वाटावे अशी असुरक्षित परिस्थिती आहे. सर्वच क्षेत्रात आज अस्थिरता आहे. (Chandrakant More guidance about Supreme Seva with blessings of Gurumauli nashik news)
या सर्व भयानक स्थितीत भारत माता समर्थपणे उभी राहावी, येथील सामाजिक, राजकीय, धार्मिक बाबींमध्ये वादविवाद, तंटेबखेडे न होता सौहार्द टिकून राहावा, भारत मातेवर रोगराई, जलप्रलंय, दुष्काळ, भूकंप, वादळे अशी अनेक निसर्गनिर्मित तर अनाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद, युद्ध, महायुद्ध अशी अनेक मानवनिर्मित संकटे येऊ नये, यासाठी गत तीन वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथील श्री. स्वामी समर्थ गुरुपीठात श्री. नवनाथ पारायणाची सेवा सूरू असून या उपक्रमात आतापर्यंत गत तीन वर्षात सव्वा लक्ष महिला, पुरुष सेवेकरी व भाविकांनी सहभाग नोंदवून समर्थ, संपन्न भारत मातेसाठी सव्वालक्ष श्री.नवनाथ पारायण केले असून ही सेवा भविष्यात सुद्धा निरंतर सुरु राहील, अशी माहिती गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.
अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ हे त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीतील समर्थ सेवामार्गाचे आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय संशोधन केंद्र असून गुरुपीठात वर्षभर सातत्याने अखंडितपणे विविध कार्यक्रम, उपक्रम सुरु असतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जेव्हा समाजासमोर, देशासमोर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न, अडचणी, समस्या उभ्या राहतात तेव्हा प्रधान केंद्र (दिंडोरी), गुरुपीठ (त्र्यंबकेश्वर) सह देशभरातील हजारो केंद्रावर आवश्यक ती आध्यात्मिक, सामाजिक सेवा तातडीने हाती घेण्यात येते, अशी माहिती देऊन चंद्रकांतदादा मोरे यांनी श्री.नवनाथ सेवेबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, गत तीन वर्षांपासून महिन्यातील दुसऱ्या रविवारी साडेतीन ते चार हजार लोक देशभरातून येऊन एकदिवसीय नवनाथ पारायणात सहभागी होतात.
या सेवेत सहभागी जे सहभाग नोंदवितात त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या प्रश्न आपोआप मार्गी लागत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. राष्ट्रासमोरील संकटे सुद्धा दूर होऊन भारत माता संपन्न, समर्थ होण्यासाठी ही सेवा उपयोगी पडेल असा विश्वास सुद्धा चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केला आहे.
त्र्यंबकेश्वर ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत पूजनीय, पवित्र भूमी आहे. ब्रह्मगिरीवर गंगा उगम पावते, ज्योतिर्लिंग येथे आहे, ही सिंहस्थ कुंभनगरी आहे, निवृत्तिनाथांची पावन भूमी आहे, गौतमी सारख्या अनेक ऋषी, मुनी सिद्ध योगी, नाथ यांनी येथे तपश्चर्या, उपासना केली आहे, येथेच गुरुपीठात श्री.स्वामी समर्थ महाराजांसह कुलदेवींची शक्ती, कालभैरव महाराज, हनुमान सर्वांचे अस्तित्व आहे. म्हणूनच या ठिकाणी केलेली सेवा अधिक फलदायी ठरते, असा विश्वास चंद्रकांत दादा यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.