Chandrasekhar Bawankule News : भारतीय जनता पक्षाचे सुपर वॉरियर्स म्हणजे, जिल्ह्यातील प्रमुख योद्धे आहेत. आगामी काळात तुमच्यातील कोणीतरी सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार झालेले मला पाहावयाचे आहे.
मुळातच, आपले काम पक्षासाठी नसून देशासाठी आहे. सुपर वॉरिअर्सने दिवसातील ३ तास पक्षाला दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे ३४० हून अधिक खासदार निवडून येतील, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला. (Chandrasekhar Bawankule statement about BJP will get more than 340 seats in Lok Sabha elections nashik news)
स्वामी नारायण मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या मालेगाव बाह्य-मध्य व बागलाण विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधी व सुपर वॉरियर्सची संवाद सभा शनिवारी (ता. २५) झाली. यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते.
पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, डॉ. प्रतापराव दिघावकर, धनराज विसपुते, डॉ. विलास बच्छाव, दादा जाधव, दीपक पवार, नितीन पोफळे, संजय भामरे, नितीन सोनवणे, एकलाख नागा, देवा पाटील, गजेंद्र देवरे, कमलेश निकम आदी उपस्थित होते.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री
श्री. बावनकुळे म्हणाले, की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४५ हून अधिक जागांवर पक्षाला विजय मिळेल. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. राज्यात महायुतीची सत्ता येईल.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. म्हणून केंद्राचे गेल्या साडेनऊ वर्षातील केलेले काम आणि योजनांची माहिती धुळे लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख कुटुंबांपर्यंत पोचवा.
धुळे लोकसभा मतदारसंघातील कोणती कामे राहिले आहेत हे मी जाणून घेणार. मालेगाव मध्यमधील काही महिलांनी स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. ही चिंतेची बाब आहे. कार्यकर्त्यांनी सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.
पक्षाच्या संघटनात्मक मालेगाव भागातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा ऑनलाइन अहवाल दाखवत श्री. बावनकुळे यांनी त्यांचे कौतुक केले. डॉ. भामरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात विकासकामे केल्याचे नमूद केले. श्री. कचवे यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुपर वॉरियरचे काम उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.