Chandrashekhar Bawankle | नाशिक पदवीधर संदर्भात भाजप उद्या निर्णय घेणार : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule esakal
Updated on

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने उमेदवार दिला नसला तरी, कोण आपल्या विचारांचा आहे, याचा विचार करून कोणत्या अपक्ष उमेदवाराला साथ द्यायची किंवा त्याच्या पाठीमागे उभे राहायचे याचा निर्णय भाजपच्या वतीने बुधवारी (ता. २३) घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Chandrashekhar Bawankle statement BJP will take decision tomorrow regarding Nashik graduates nashik news)

विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने बावनकुळे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागपूर व अमरावती पदवीधर मतदारसंघात विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपने प्रवेश केला असून, मराठवाडा व नाशिक विधान परिषदेच्या दोन जागा महत्त्वाच्या असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

नाशिकमध्ये भाजपने उमेदवार उभा केला नाही. मात्र आपल्या विचारांचा व भविष्यात आपल्याला कोण साथ देईल, याचा विचार करून बुधवारी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने उमेदवार उभा केला नसला तरी काँग्रेसची उमेदवारी मिळूनही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे यांना चाल दिली.

तांबे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपची भूमिका नाशिक पदवीधर मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Chandrashekhar Bawankule
Satyajeet Tambe | नाशिक, अहमदनगरमध्ये आयटी-ऑटोमोबाईल हब : अपक्ष सत्यजित तांबे

भाजपचे पूर्ण सत्तेचे स्वप्न

गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील पूर्ण सत्ता येणे गरजेचे आहे. भाजपचे दीडशेपेक्षा अधिक आमदार विधानसभेसाठी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. विधान परिषदेमध्ये भाजपला बहुमतासाठी दोन मतांची आवश्यकता आहे,

त्यामुळे आपल्या विचारांचा व आपल्याला साथ देणाऱ्या उमेदवाराला नाशिक, मराठवाडा व कोकण विभागातून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. विधान परिषदेत बहुमत झाल्यास सभापतिपदासह लव- जिहादसारखे विधेयक मंजूर करण्यात अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Cyber Crime | बनावट मेसेजना बळी पडू नका, सायबर भामट्यांपासून सावध राहा : विजय सिंघल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()