उद्धव ठाकरेंवर संजय राऊत यांचा ट्रॅप : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule latest marathi news
Chandrashekhar Bawankule latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : शिवसेना (Shiv sena) वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्रॅप मधून बाहेर पडावे असा सल्ला देताना भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी आरक्षणाला (OBC reservation) अजित पवार (Ajit pawar) व उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा आरोप केला. (Chandrashekhar Bawankule statement about sanjay raut uddhav thackeray maharashtra political Latest Marathi news)

नाशिक मध्ये ओबीसी मेळाव्यासाठी श्री. बावनकुळे आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर प्रथम त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सामना मधील मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला.

तेच प्रश्न विचारणार व तेच उत्तर देणार, बंद खोलीत घेतलेली ही मुलाखत मॅच फिक्सिंगच आहे. ठाकरे यांना मुलाखत द्यायची होती तर प्रसिद्धी माध्यमांसमोर द्यायला हवी होती. ठाकरे यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

महाविकास आघाडीचे नेते ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. आम्हीच ओबीसी नेते आहोत. असे दाखवण्याचा काहीजण प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी भुजबळ, वडेट्टीवार यांचे नाव घेत दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ लावू नये. राज्याच्या विकासासाठी हजार वेळा जावे लागले तरी ते जातील.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिखावापणा बंद करून विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ, उत्तर महाराष्ट्र वैज्ञानिक विकास महामंडळ बंद का केली ? याचे उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Chandrashekhar Bawankule latest marathi news
गटारी अमावस्या : तळीरामांवर एक्साईज, पोलिसांची करडी नजर

ठाकरे, पवार झारीतील शुक्राचार्य

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये यासाठी षडयंत्र रचले होते. ओबीसींचा डेटा संकलित करण्यासाठी निरगुडे आयोगाने 435 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती मागणी फेटाळून लावली.

आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायम केले आहे. त्यावर महाविकास आघाडीचे नेते राजकीय पोळी भाजत असून ठाकरे व पवार हेच ओबीसी आरक्षण विरोधातील झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप श्री. बावनकुळे यांनी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाल्याचा दावा केला.

Chandrashekhar Bawankule latest marathi news
Nashik : वेतनविना ZP कर्मचारी आर्थिक संकटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.