Chandrashekhar Bawankule : अवकाळी पाऊस व गारपिटीने बागलाणचा शेतकरी हतबल झाला असून प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळवून द्यायची असेल तर नुकसानग्रस्त शेतीच्या पीक पंचनाम्यातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रयत्न करणार प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. (Chandrashekhar Bawankule statement Striving to remove errors in Panchanama nashik news)
सरकार जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जात नाही, तोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. म्हणूनच मी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी वकिली राज्य सरकारकडे करणार असल्याचेही सांगितले.
येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात बागलाण तालुका व सटाणा शहर भाजपातर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभेत श्री. बावनकुळे बोलत होते.
अध्यक्षस्थानी खासदार डॉ.सुभाष भामरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, रवींद्र अनासपुरे, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा नेते डॉ.शेषराव पाटील, साहेबराव सोनवणे, श्रीधर कोठावदे, नीलेश कचवे, तालुकाध्यक्ष संजय देवरे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे उपस्थित होते.
श्री.बावनकुळे म्हणाले, अवकाळी व गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी त्याबरोबरच राज्यातील प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांद्याच्या लिलाव पावती वरच कांदा अनुदान मिळावे अशी भाजपची इच्छा आहे. कुणीही ही नुकसान भरपाई व कांदा अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचेही श्री.बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
डॉ. भामरे म्हणाले, हरणबारी डावा उजवा कालवा, तळवाडे भामेर पोहोच कालवा, केळझर चारी क्रमांक आठ बरोबरच डावा उजवा कालवा हे सिंचनाचे प्रमुख प्रकल्प गेल्या ४५ वर्षापासून प्रलंबित होती.
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून मी ही सिंचनाची कामे मार्गी लावली आहे. केंद्र शासनाच्या समाज हिताच्या अनेकविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने पार पाडावी असे आवाहनही केले.
श्री. बोरसे यांनी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने सर्व समावेशक उमेदवार देण्याची मागणी करीत पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्याने पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले.
मेळाव्यास नंदकुमार खैरनार, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंगेश खैरनार, शहराध्यक्ष किरण नांद्रे, संजय भामरे, समको संचालक रमेश देवरे, रमण छाजेड, कैलास येवला, जगदीश मुंडावरे, महेश देवरे, पंकज ततार, डॉ. विलास बच्छाव, कृष्णा भामरे, डॉ. दीपपाल गिरासे, पंकज ठाकरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा संघटक सुरेश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकर पाटील व श्रीमती पुष्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.