चांदवड (जि. नाशिक) : जानेवारी रोजी जलजीवन योजनेची माहिती व अंमलबजावणीसाठी विशेष ग्रामसभा घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या होत्या. मात्र तरीही चांदवड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या विशेष ग्रामसभा घेतलेल्या नसल्याचे समोर आले आहे. (Chandwad forgets special Gram Sabha apparent that gram sabhas have not been held in many villages nashik news)
प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांत लाखो रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात अनेक बाबींची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही इतक्या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर देखील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा झालेल्या नाहीत हे विशेष.
ग्रामसभेत जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, या योजनेत प्राप्त निधीतून काय कामे होणार आहेत, कामाचे अंदाजपत्रक, मंजूर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती आदी तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात यावी व त्याअनुषंगाने चर्चा घडवून आणणे आवश्यक होते.
या ग्रामसभा बाबत गाव कारभारी यांना ग्रामसेवकांनी व अधिकाऱ्यांनी सांगितले नाही का ? ग्रामस्थांना या बाबतीत अंधारात ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का. असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
ग्रामसभा न घेतलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कारवाई होणार आहे का व पुन्हा या विषयावर विशेष ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या व्यवस्थेसह व्हाव्यात अशीही ग्रामस्थांची मागणी आहे.
विटावेत ग्रामसभा तहकूब
ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नाही, ग्रामसभेचे दप्तर उपलब्ध नाही, मागील ग्रामसभेतील विषय माहीत नाही तसेच टिपणी रजिस्टर नसल्याचे पाहून संतप्त गावकऱ्यांनी विटावेत ग्रामसभा बंद पाडली.
मागील ग्रामसभेचे इतिवृत्त मिळेपर्यंत तसेच ग्रामसेवक उपस्थित राहात नाहीत, तोपर्यंत ग्रामसभा होऊ द्यायची नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला. येथील ग्रामसेवकाकडे दुसऱ्या ग्रामपंचायतीचा कारभार असल्याने ते तिकडे होते. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक दातीर यांनी
ग्रामसेवकांची भूमिका पार पाडली. मात्र ग्रामसभेस आवश्यक लागणारे दप्तर उपलब्ध नव्हते. त्यामुळे तहकूब करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.