Inspiration Story : चांदवडची ‘इंद्रायणी पाणीपुरी’ खातेय भाव !

Nashik: Aarti and Rupesh Pawar are the couple who created the identity of Chandwad's 'Indrayani Panipuri'.
Nashik: Aarti and Rupesh Pawar are the couple who created the identity of Chandwad's 'Indrayani Panipuri'.esakal
Updated on

Nashik News : चांदवडची ओळख ऐतिहासिकदृष्ट्या आहेच. पण तेथील कंदी पेढेही प्रसिद्ध आहेत. आता त्याला नवी जोड देण्यात येथील आरती आणि रूपेश पवार दांपत्य यशस्वी ठरले आहेत.

त्यांनी ‘इंद्रायणी पाणीपुरी’ने आगळीवेगळी ओळख निर्माण करीत बाजारपेठेत एक स्थान निर्माण केले आहे.

कोरोनाकाळात काम नसल्याने फोटोग्राफी करणाऱ्या रूपेशला घरी बसावे लागल्यावर कॅमेरा सोडून त्याने पत्नीसोबत रेणुकामाता मंदिराच्या परिसरात पाणीपुरीचा गाडा लावला. (Chandwad Indrayani Pani Puri Famous young couple took plunge Business training is also given to Marathi youth Nashik News)

कोरोनाकाळात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार सांभाळणे रूपेशला कठीण झाले होते. मग तो सकाळपासून सायंकाळपर्यंत पाणीपुरी विक्रीमधून घराचा गाडा चालवू लागला. रूपेशने इथेच न थांबता, पाणीपुरीचे प्रशिक्षण घेण्यासाठी नाशिक गाठले.

बरीच भटकंती केल्यावर व्यवसायाचे गुपित सांगण्यास कुणीही तयार नसल्याचे अनुभवल्यावर मग घरी स्वतः प्रयोग सुरू केला. पाणीपुरी, त्याचे पाणी, चटणी आदींचा अभ्यास करून पाणीपुरी चटकदार बनविली. खवयांनी चांगला प्रतिसाद दिला आणि तालुक्यात पाणीपुरी पोचली.

Nashik: Aarti and Rupesh Pawar are the couple who created the identity of Chandwad's 'Indrayani Panipuri'.
Nashik News : मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर-ताल-नृत्य

तरुणांना बनविले व्यावसायिक

दांपत्याने घरासाठी घेतलेले कर्ज पाणीपुरी व्यवसायातून फेडले. त्यांनी मराठी युवकांनी हा व्यवसाय करावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. दोघे पाणीपुरी करायचे प्रशिक्षण देऊ लागले आहेत. स्टॉल बनवून देत आहेत.

वर्षभरात महाराष्ट्रातील सव्वादोनशे युवकांना पाणीपुरी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. राज्यात त्यांचे ३० स्टॉल सुरू झाले आहेत. स्टॉल चालविणारे युवक व्यावसायिक बनले. साठ हजारांत पूर्ण स्टॉल ते स्वतःच बनवून देतात.

कमी पैशांमध्ये मराठी युवक रोजगाराची निर्मिती करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मानसिकता ‘ग्लोबल’ ठेवल्यास यश हमखास मिळते, असे पवार दांपत्य सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik: Aarti and Rupesh Pawar are the couple who created the identity of Chandwad's 'Indrayani Panipuri'.
Grapes Rate News : जूनमध्ये सूर्य तळपल्यास द्राक्षांचे ‘बंपर क्रॉप’!

आत्महत्येपासून केले परावृत्त

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना एक कर्मचारी आत्महत्या करण्यास निघाला होता. पवार दांपत्याला हे समजल्यानंतर त्यांनी त्याची भेट घेत, त्या व्यक्तीला पाणीपुरीचा स्टॉल लावण्याचा सल्ला देत या व्यवसायातील गुपित आणि प्रशिक्षण देऊन एक स्टॉलही दिला.

आता ती व्यक्ती या व्यवसायात समाधानी असल्याचे पवार सांगतात.

Nashik: Aarti and Rupesh Pawar are the couple who created the identity of Chandwad's 'Indrayani Panipuri'.
Crime News: एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय मुलीचं अपहरण; तणावाखाली येऊन आई-वडिलांनी उचललं टोकचं पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()