Chandwad Market Committee : बाजार समितीच्या गुरुवारी (ता.२०) अर्ज माघारीनंतर ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण १६१ उमेदवारांपैकी तब्बल ११७ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले.
तर महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पाच उमेदवारांना माघारीची वेळ संपल्याने माघार घेता आली नाही. (Chandwad Market Committee Peoples Development Against Farmers Development Panel Face to Face nashik news)
उमेदवारांची माघार घेताना व पॅनल तयार करताना दोन्ही पॅनलच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागली. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या लढतीत माघारीनंतर महाविकास आघाडीच्या माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार उत्तम भालेराव व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य परिवर्तन पॅनल व भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.
बाजार समितीच्या या निवडणुकीत प्रहारचे गणेश निंबाळकर यांची ही ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून अपक्ष उमेदवारी असल्याने निवडणूक रंगतदार होत आहे.
माघारीनंतर महा विकास आघाडीच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलचे सोसायटी गटाच्या सर्वसाधारण जागेवर भगवान खताळ, कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, नितीन गुंजाळ, राजेंद्र दवंडे,
अनिल पाटील, बिंटू भोयटे, महिला राखीव गटात डॉ. वैशाली श्यामराव जाधव, मीना बापू शिरसाठ, इतर मागास प्रवर्गासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, भटक्या जमाती प्रवर्गात विक्रम मार्कंड तर ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण जागेसाठी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव,
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आहेर, आर्थिक दुर्बल गटातून अनिल ठोके, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात दयानंद आहिरे यांची तर हमाल मापारी गटातून प्रविण कर्हे , व्यापारी गटातून सचिन अग्रवाल, शरद कोतवाल यांची उमेदवारी आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
भाजपच्या डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल कडून सोसायटी गटातील सर्वसाधारण जागेसाठी माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुखदेव जाधव, योगेश ढोमसे, निवृत्ती घुले,
पंढरीनाथ खताळ, अनिल कोठुळे, अॅड. शांताराम भवर, महिला राखीव गटात योगिता दिगंबर वाघ, गीता रावसाहेब झाल्टे, इतर मागास प्रवर्गासाठी सचिन निकम, भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात खंडेराव आरतनुर, तर ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण जागेसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, आर्थिक दुर्बल गटातून निवृत्ती
घाटे, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात वाल्मीक वानखेडे, हमाल मापारी गटातून रवींद्र पवार, व्यापारी गटातून सुशील पलोड, शिवाजी ढगे यांची उमेदवारी आहे.
महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ मिटला नाही. सोसायटी सर्वसाधारण गटात राष्ट्रवादीचे रघुनाथ आहेर, विजय जाधव, रंगनाथ थोरात,
कॉंग्रेसचे संपतराव वक्टे, तर ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात कॉंग्रेसचे भीमराव निरभवणे यांच्या उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुटला नाही. चर्चेतच माघारीची वेळ संपल्याने उमेदवारी अर्ज तसेच राहिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.