चांदवड : यंदा राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चांदवड तालुक्यात ही दुष्काळाची अत्यंत दाहक परीस्थिती आहे.
याच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. चांदवड तालुक्यात दुष्काळामुळे दुसरा बळी गेला आहे. (Chandwad Shingve farmer commits suicide due to depression of drought Nashik News)
नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे. शिंगवे ता. चांदवड येथील चिंधू दादा गुंड या गरीब शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी खेलदरी येथील शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.
यंदा कमी पाऊस झाल्याने पीकं हातची गेली आहेत. ही परिस्थिती नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम देखील वाया गेला आहे . यामुळे शेतकरी संकटात आहे.
गेली सततची तीन वर्षे सततची नापिकी, अवकाळी व यावर्षी चा दुष्काळ यामुळे ते प्रचंड निराश होते. गुंड यांची शिंगवे शिवारात दिड एकर शेती आहे. अल्पभूधारक असलेल्या गुंड यांना गेल्या तीन चार वर्षांपासून शेतीतून काहीच उत्पन्न निघत नव्हते.
ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. अशातच यावर्षी तर पाऊस पडलाच नाही त्यामुळे शेतातून काहीही उत्पन्न मिळणार नव्हते. थोड्या ओलीवर केलेल्या पेरणीचाखर्चही वाया गेल्याने ते प्रचंड नैराश्यात होते.
गेल्या महिनाभरापासून ते नैराश्यात होते व आता मी कर्ज कसे फेडू आता काय करू असं ते बोलत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.