Nashik News : चांदवडचे शब्द अन्‌ सिन्नरचा आवाज ‘गैरी’ चित्रपटात!

Vishnu Thore & Singer
Vishnu Thore & Singer esakal
Updated on

नाशिक : युक्ता प्रॉडक्शन, द्विजराज फिल्मनिर्मित व पाडुरंग बाबुराव जाधव दिग्दर्शीत ‘गैरी’ हा मराठी चित्रपट येत्या १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून, या चित्रपटातील एक गीत चांदवड येथील कवी, गीतकार विष्णू थोरे यांनी लिहिले असून, सिन्नर येथील प्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल मराठी फेम ऋषिकेश शेलार यांनी गायले आहे. या गीताचे संगीत मयुरेश केळकर यांचे आहे. (Chandwad writers words and Sinner singer voice in marathi movie Gairi nashik Latest Marathi News)

आदिवासी समाजातील समस्या मांडणारा व डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणांची वास्तव गोष्ट सांगणारा ‘गैरी’ हा मराठी चित्रपट आहे. यात नाशिक जिल्ह्यातील दोन प्रतिभावांताचा अविष्कार ‘कोण होतो पाठीराखा, आहे कोण कुणासाठी असा जलम उन्हाचा सैल त्याच्या गाठी’ या गीताच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या आधीही निर्माता गणपत जगतापनिर्मित विष्णू थोरे आणि ऋषिकेश शेलार यांचे ‘भीम गेला परदेशी’ हे गीत लोकप्रिय झाले होते. बऱ्याच अवधीनंतर दोघेही गैरी चित्रपटातून एकत्र येत आहेत. गीतकार विष्णू थोरे यांनी याआधी चौर्य, घाटी, राडा, पीटर व जैतर या चित्रपटांसाठी गीतलेखन केले असून, या चित्रपटातील त्यांची गीतेही लोकप्रिय झाली आहेत.

तर गायक ऋषिकेश शेलार यांचे मराठी चित्रपटातील हे पहिलेच गीत असले तरी ‘शिकायते’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी गायन केले आहे. पाऊस गाताना, तुला येता जाता, आपली यारी एक नंबर, प्रेमरंगी, डोळ्यात साठव पाण्याचं तळ, काळजाचं घुंगरू ही त्यांची अल्बम गीते प्रसिद्ध झाली आहेत. मराठी इंडियन आयडॉल या सोनी मराठीवरील कार्यक्रमातून सिन्नर येथील गायक ऋषिकेश शेलार अधिक चर्चेत आले.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Vishnu Thore & Singer
Nashik Sports News : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत नाशिक उपविजयी

दोघेही शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे शब्दांवर प्रभुत्व आहे. एकत्र येऊन चांगले काहीतरी निर्माण करण्याचा दोघांचाही माणस आहे. दोघांच्या अविष्कारातील ‘गैरी’ चित्रटातील गीत झी म्युझिक कंपनीने नुकतेच प्रदर्शित केले असून, प्रेक्षकांची पसंती या गीताला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला असून, या चित्रपटातील दोन गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत.

अमितराज व मयुरेश केळकर यांचे संगीत या चित्रपटाला आहे. वैशाली सामंत, अमितराज, मधुरा कुंभार, ऋषिकेश शेलार यांनी गायन केले आहे. फुलवा खामकर यांचे नृत्य दिग्दर्शन असून, छायालेखन विनोद पाटील यांचे आहे. अभिनेता मयुरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रमोद रानरावे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत.

Vishnu Thore & Singer
Nashik News : मनमाड परिसरात शेकोट्या पेटल्या; थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.