Sakal Exclusive : अंजीर शेतीतून फुलविला समृद्धीचा पाया

Changdev Jadhav produces figs worth 3 lakhs on 45 guntha area
Changdev Jadhav produces figs worth 3 lakhs on 45 guntha areaesakal
Updated on

Sakal Exclusive : अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या (Nashik News) अंजीरातून शेतकऱ्याला तीन ते सव्वातीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील चांगदेव विठ्ठल जाधव यांचा ‘अंजीर’ उत्पादक शेतकरी हा प्रवास प्रेरक आहे. (Changdev Jadhav produces figs worth 3 lakhs on 45 guntha area nashik news)

पारंपरिक पीकपद्धतीत शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नसल्याने परिसरातील अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी मार्ग काढत आहेत.

शहा (ता. सिन्नर) येथील श्री. जाधव यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग करून कुटुंबाला एक नवीन दिशा दिली. येथे उजव्या व डावा पाट असून, परिसरात ऊस, कांदा, गहू, मका ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

पारंपरिक शेतीमुळे शेतकरी उभा राहणार नाही, असे श्री. जाधव व त्यांचा मुलगा शेखर यांचे एकमत झाले. २००८ पासून ४५ गुंठे क्षेत्रावर ते मेहनतीने व आत्मविश्वासाने अंजीरचे उत्पादन घेत आहेत. चांगदेव जाधव हे रत्नाबाई जाधव (पत्नी), मुलगा शेखर व सून पुष्पा या सर्वांनी अथक परिश्रमातून अंजीर शेतीतून इतरांना प्रेरणा दिली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Changdev Jadhav produces figs worth 3 lakhs on 45 guntha area
Innovation : शहरातील ‘ब्लॅक स्पॉट डिडक्शन’ शक्‍य; राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्‍निकच्‍या विद्यार्थ्यांचे यश

‘दिनकर’ जातीच्या अंजीराची रोपे

२००८ ला १५×१५ फूट अंतर ठेवून अंजीराची लागवड केली. प्रथम ठिबक सिंचन व्यवस्थापन करून २×२ फुटाचे खड्डे खोदून त्यात शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट मातीमिश्रित करून ‘दिनकर’ जातीच्या अंजीराची १९४ रोपांची लागवड केली.

प्रतिरोप ३० रुपये प्रमाणे पाच हजार ८२० रोपांचा खर्च आला. ही रोपे शारदानगर, बारामती येथून मागविण्यात आली. २५ हजार ठिबक व रोप लागवड मजुरी खर्च आला. झाड लागवड केल्यानंतर दोन वर्षांनंतर फळ घेतले. साधारण: १३५ दिवसांनंतर फळ परिपक्व होऊन काढणीस आले.

साडेपाच टन उत्पादन

पाच ते सहा वर्षांनंतर प्रतिझाड ३० किलो अंजीर फळाचे उत्पादन देते. ५० फळे जागेवरच व्यापाऱ्यांना ७५ रुपये किलोप्रमाणे विक्री होतात व उर्वरित फळे शिर्डी, राहता व नाशिक येथील फळविक्री करणारे स्टॉलला ८५ रुपये किलोप्रमाणे पोच केली जातात.

Changdev Jadhav produces figs worth 3 lakhs on 45 guntha area
Nashik Kala Katta : सुंदर अक्षर घडविणारे सुलेखनकार नीलेश, पूजा गायधनी

साधारण गतवर्षी १९४ झाडांपासून ५ ते ५.५ टन उत्पादन मिळाले. (फळ उत्पादन हे पीक नियोजनावर अवलंबून आहे) उत्पादन खर्च ६० ते ७० हजार रुपये वजाजाता तीन ते साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा मिळाला.

‌‌"शेतकरी आपल्या शेतात पारंपरिक पिके घेतात. अंजीर फळात जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे मागणी मोठी आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास यश निश्चित आहे." - चांगदेव जाधव, शेतकरी

‌"अंजीरात असणारे ॲन्टिऑक्सिडंट हे तुमच्या शरीरातील रक्तदाबाला नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. याशिवाय हृदय निरोगी राखण्यासाठीही याची मदत मिळते. अंजीर हे शरीरातील हृदयासंबंधित समस्यांचे प्रमुख कारण असणाऱ्या ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी करून आरोग्य चांगले राखण्यास फायदेशीर ठरते." - अण्णासाहेब गागरे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर

Changdev Jadhav produces figs worth 3 lakhs on 45 guntha area
Nashik News : महापालिकेच्या मोकळे भूखंड बचतगटांसाठी : आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.