Nashik Smart City : स्मार्ट रस्त्याच्या नियोजनात पुन्हा बदल

change again in smart road planning of smart city project nashik news
change again in smart road planning of smart city project nashik news
Updated on

Smart City Project : स्मार्टसिटी कंपनीकडून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रस्त्याच्या नियोजनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. यानिमित्ताने रस्त्याच्या कामातील त्रुटी पुन्हा उघड झाल्या आहे.

आता नवीन नियोजनात अपघात व वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतं असलेले डाव्या बाजूचे पदपथ हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (change again in smart road planning of smart city project nashik news)

स्मार्टसिटी कंपनीकडून जवळपास २२ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट रोड तयार करण्यात आला. मुळात रस्ता तयार करताना नागरिकांच्या सूचना न घेता मनमानी पद्धतीने आराखडा तयार करण्यात आला. रस्ता तयार झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याऐवजी कोंडी व अपघातांमध्ये भर पडली. सीबीएसकडून अशोकस्तंभ किंवा शरणपूर रोडकडे वळताना पदपथाच्या रचनेमुळे अडचण येत होती.

सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर शिवाजी रोडकडून जिल्हा बॅंकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डाव्या वळणावरील पदपथ काही दिवसांपूर्वी हटविण्यात आले.

change again in smart road planning of smart city project nashik news
Nashik News : शहरात अनधिकृत कॅफेची अचानक तपासणी मोहीम; या कॅफेंवर कारवाई

त्यापाठोपाठ आता शरणपूर रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डाव्या बाजूला वळताना अडथळा ठरणारा पदपथ हटविण्यात आला आहे.

निशिकांत पगारे, राजू देसले, प्रा. सोमनाथ मुठाळ, योगेश कापसे, प्रकाश बेळे, संदीप नगरकर, जानकीराम कोल्हे, मनीष बाविस्कर, प्राजक्ता कापडणीस, निवृत्ती कसबे, आदींनी या चौकातील डाव्या बाजूला वळताना अडचणीचे ठरणारे सर्वच पदपथ हटविण्याची मागणी स्मार्ट कंपनीकडे केली होती. स्मार्टसिटी कंपनीकडून पदपथाचे अडथळे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

change again in smart road planning of smart city project nashik news
NMC News : 1 टक्का निधी मिळविण्यासाठी महापालिकेची धाव; ब्लॅक स्पॉट मुक्तीसाठी परिवहन विभागाला पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.