Traffic Management : हनुमान जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; हे असतील मार्ग

Traffic Management
Traffic Managementesakal
Updated on

नाशिक : हनुमान जयंतीनिमित्त शहरात येत्या गुरुवारी (ता. ६) ठिकठिकाणी मिरवणूक निघणार आहे. या पार्श्वभूमीवर भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाणे हद्दीमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. (Change in traffic route on the occasion of Hanuman Jayanti nashik news)

Traffic Management
Market Committee Election : धुळे जिल्ह्यात बाजार समित्यांची रणधुमाळी सुरू

हनुमान जयंतीदिनी मिरवणूक वझरे मारुती मंदिर, चौकमंडई, भद्रकाली दूधबाजार, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, सांगली बॅंक सिग्नल, मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रामकुंड पंचवटी या मार्गाने निघणार असून, सदर मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी दुपारी तीनपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद असेल.

त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.

पर्यायी मार्ग

-बागवान पुरा पोलिस चौकी ते अमरधाम रोड ते पंचवटी असा मार्ग

-सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, शालिमार, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, पंचवटी असा मार्ग

-पंचवटी कारंजाकडून येणारी वाहतूक मखमलाबाद नाका, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका असा मार्ग

-सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारे मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, घारपुरे घाट, रामवाडी पूल, मखमलाबाद मार्गे पंचवटीकडे

Traffic Management
Vedokt Controversy : छत्रपतींनी सुरु केलेल्या गोष्टी नष्ट करणार का? पुरोहित संघाचा पुरुषोत्तम खेडेकरांना सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.