Nashik Police Transfer: पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात पुन्हा फेर‘बदल’! बदल्यांमुळे काहीं अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्या करण्यात आल्या.
Police Transfer
Police Transferesakal
Updated on

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्या करण्यात आल्या.

परंतु यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आल्याने पुन्हा काही अधिकाऱ्यांच्या सुधारित बदल्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहे. (Change of police inspector again Discontent among some officers due to transfers nashik news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन दिवसांपूर्वीच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.

कार्यकारी अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्ती करीत, त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यापासून संरक्षण मिळाले. परंतु यातून काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. यातून पुन्हा काही तासांमध्ये सुधारित बदल्यांचे आदेश जारी केले गेले.

पूर्वीच्या बदल्यांमध्ये गंगापूरचे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांना विशेष शाखेत, तर, सातपूरचे निरीक्षक पंकज भालेराव यांना आर्थिक शाखेत नेमण्यात आले होते.

सुधारित बदल्यांमध्ये निंबाळकर यांना आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी तर भालेराव यांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय, त्यांच्याकडे खंडणी आणि दरोडा-शस्त्र विरोधी पथकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तसेच, उपनगरचे पोलिस निरीक्षक विजय पगारे यांची तक्रार निवारण कक्षात प्रभारी पदावर नियुक्त केले आहे.

Police Transfer
PSI Convocation Ceremony: पोलीस कॉन्स्टेबल झालो तेव्हाच ‘कॅप’चे पाहिले होते स्वप्न! पैठणचा सलमान झाला पोलीस उपनिरीक्षक

तर म्हसरुळचे निरीक्षक राजू पाचोकर यांना अभियोग कक्ष आणि कोर्ट सुरक्षा विभागात नेमले आहे. त्याचप्रमाणे, उपनगरचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सरकारवाडाचे तुषार अढावू यांना विशेष शाखेत नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

बारी-वाघ यांच्यात खांदेपालट

नाशिकरोड विभागाचे सहायक आयुक्त आनंदा वाघ यांची बदली महाराष्ट्र पोलीस अकादमीत झालेली आहे. परंतु आयुक्तांनी अद्याप त्यांना मुक्त केलेले नाही. उलट त्यांच्याकडे वाहतूक व विशेष शाखेची जबाबदारी दिली आहे.

तर, वाहतूकचे सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांना नाशिकरोड विभागाची जबाबदारी दिली आहे. विशेष शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांना प्रशासन विभागात नेमण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्यात आलेले आहेत

Police Transfer
Nashik: संभाजीनगरचा सलमान ठरला रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा मानकरी! 123 व्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा उत्साहात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.