Nashik News: थेट पाइपलाइन योजना निविदा प्रक्रियेत तथाकथित रावांमुळे अटी व शर्तीत बदल

अद्यापही निविदेचा दिनांक निश्चित झाला नाही काही राव बहाद्दर ठेकेदारांनी अटी व शर्ती बदलण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.
Pipeline file photo
Pipeline file photoesakal
Updated on

नाशिक : गंगापूर थेट जलवाहिनी योजना अमलात आणण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची वेळ आली असताना पुन्हा काही तथाकथित रावांच्या दबावामुळे अटी व शर्तीमध्ये बदल करून १५ जानेवारीपर्यंत प्रक्रिया लांब पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. (Changes in terms and conditions in direct pipeline project tender process due to so called Rao Nashik News)

गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलले जाते ते कच्चे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणून तेथे शुद्धीकरण करून जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो.

नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून बाराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन सिमेंटच्या कच्चा पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या २००० च्या दरम्यान टाकल्या होत्या.

परंतु मागील २३ वर्षात या जलवाहिनीची वहनक्षमता कमी होण्याबरोबरच गळती होत असल्याने गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यान साडेबारा किलोमीटर लांबीची व अठराशे मिलिमीटर व्यासाची नवीन लोखंडे जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून २०४.३८ कोटी रुपये खर्च मंजूर झाला.

मात्र अद्यापही निविदेचा दिनांक निश्चित झाला नाही काही राव बहाद्दर ठेकेदारांनी अटी व शर्ती बदलण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.

Pipeline file photo
Nashik News: माती ऐवजी चिखल; यांत्रिकी झाडूला धाप

नवीन बांधकाम दरसूचीचा समावेश करणे, काम केल्याच्या अनुभवाची अट येथील करणे यासारखे बदल करण्यासाठी दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.

निविदा सादर करण्याची मूळ तारीख २० डिसेंबर निश्चित करण्यात आली होती, मात्र त्यानंतर देखील निविदा प्रक्रिया राबविली नाही १० जानेवारीपर्यंत निविदा भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.

निविदा पूर्व बैठकीमध्ये ठेकेदारांनी दुरुस्तीच्या प्रस्ताव सुचविले त्या बदलांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यास विलंब लावला जात असल्याचे बोलले जात आहे.

Pipeline file photo
Nashik News: निधी वाटपावरून आमदार अन् प्रशासनात संघर्ष; मोठे रस्ते कामासाठी निधी खर्चाचे नियोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()