Bakri Eid Traffic Management: बकरी ईद पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल! पर्यायी मार्गांचे अवलंब करण्याचे आवाहन

Traffic Management
Traffic Managementesakal
Updated on

Bakri Eid Traffic Management : गुरुवारी (ता. २९) बकरी ईद असून यानिमित्त सामुहिक नमाज पठण करण्यासाठी त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते.

त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. (Changes in traffic route in background of Bakri Eid appeal to adopt alternative routes nashik news)

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण येत्या गुरुवारी (ता. २९) साजरा होतो आहे. यानिमित्ताने त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर शहरातील शेकडो मुस्लिम बांधव सामुहिक नमाज पठण करण्यासाठी येतात.

यामुळे त्र्यंबक रोडवर मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, त्यामुळे वाहतूक कोंडीचीही समस्या उद्‌भवू शकते. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याबाबतची अधिसूचना वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी जारी केली आहे.

सदर वाहतूक मार्गातील बदल हे सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहतील. तसेच, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका यांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Traffic Management
Bakri Eid 2023: जातीय सलोख्याचा पारनेर पॅटर्न महाराष्ट्रभर! बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लीम बांधवांचा निर्णय

हे मार्ग असतील बंद

* त्र्यंबक पोलिस चौकी ते मायको सर्कलपर्यंत रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.
* गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.

हे आहेत पर्यायी मार्ग

* मोडक सिग्नलकडून त्र्यंबककडे जाणारी वाहने सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूर नाका सिग्नल ते जुना सीटीबी सिग्नल मार्गे जातील.
* मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, चांडक सर्कल, मायको सर्कलमार्गे जुन्या सीटीबी सिग्नलमार्गे त्र्यंबककडे वाहने जातील.
* चांडक सर्कलकडून गडकरी चौकाकडे जाणारी वाहने चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी चौक, सारडा सर्कलमार्गे जातील.

Traffic Management
Ashadhi Ekadashi Bakri Eid: शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा नवा अध्याय! संगमेश्‍वरात आषाढी एकादशीला कुर्बानी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.