सायगाव (जि. नाशिक) : सध्या परिसरासह चहूकडे लग्नसराईची (Wedding Ceremony) धूम सुरू आहे. शेवटच्या टप्यात विवाह मुला मुलीचे पसंतीचे कार्यक्रम सुरू आहेत. काही वर्षात मात्र पसंतीच्या कार्यक्रमात मात्र मोठा बदल झाल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात लग्न जमवितांना मुलींची पसंती फारसी विचारत घेतली जात नव्हती, आता मात्र मुलीच म्हणू लागल्या आहेत की पसंतीचा हाच नवरा (Husband) मला पाहिजे. याचे कारणही मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या उंचावलेल्या अपेक्षा. (Changing Marriage Trends in new generation girls Nashik News)
पूर्वी कुटूंबाच्या पंसतीवरूच लग्न जमविले जात होते. मुलींना हुंडाही मोठया प्रमाणावर द्यावा लागत असे. आता मात्र परिस्थिती पूर्ण बदलली आहे. सर्वच समाजात गावोगावी विवाहासाठी अनेक नवरदेव लग्नाच्या दारात उभे आहेत. विवाहयोग्य वय टळूनही मुलगी मिळत नसल्याने कुटुबांची चिंता वाढली आहे. फक्त मुलगी द्या, सर्व काही करून घेतो. कोणत्याही जातीची, परप्रांतीय असो, आमची तयारी आहे. इतकी हतबलता व्यक्त करुनही मुलगी मिळत नसल्पाने हा प्रश्न अनेकांच्या बाबतीत गंभीर वळणावर आहे.
काही वर्षापुर्वी गर्भलिंग परिक्षणामुळे मुलींची गर्भातचं हत्या करण्यात आल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली असे म्हटले जात असले तरी सध्या लग्न जमवितांना आई वडिलाच्पा अपेक्षा मोठया प्रमाणावर वाढल्या आहेत हेही नाकारून चालणार नाही. मुलीचे शिक्षणाचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढल्याने जोडीदाराबाबतही अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे आता लग्न जमवितांना प्रथम मुलींची पसंती विचारात घेतली जात आहे. आता मुलगीच म्हणत आहे, पसंतीचा हाच नवरा पाहिजे. काही दिवसात मुलगीच मुलगा पाहण्यासाठी त्याच्या घरी गेल्यास नवल वाटायला नको. एकंदरीत लग्न जमविताना सर्वच काही बदलले असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.