SAKAL EXCLUSIVE : त्र्यंबकेश्‍वर देवस्थानचा बदलतोय चेहरामोहरा

Tribakeshwar Temple News
Tribakeshwar Temple Newsesakal
Updated on

त्र्यंबकेश्‍वर : येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसराचा चेहरामोहरा बदलतोय. देवस्थानच्या देणगीतून भाविकांना केंद्रबिंदू मानून सुलभ दर्शन व्यवस्थेची विविध कामे सुरू आहेत. पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेऊन ही कामे सुरू करण्यात येत आहेत.

सुमारे चाळीस कोटींची एकत्रित कामे असून, यातून त्र्यंबकेश्‍वर देवस्थानचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश विकास कुलकर्णी आणि विश्‍वस्त मंडळातर्फे माहिती देण्यात आली. (Changing Structure of Trimbakeshwar temple permission of Department of Archaeology combined works of forty crores started Devotees facilities are prioritized Nashik News)

Tribakeshwar Temple News
Nashik News : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

बाराव्या शतकामध्ये झांझ राजाने ज्योतिर्लिंग मंदिराची उभारणी केली. मुघलांच्या काळात अभेद्य परिसरातील मंदिराचे नुकसान झाले. पेशवाईमध्ये नानासाहेब पेशवे यांच्या कार्यकाळात मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला. १७५५ ते १७८६ मध्ये हे काम झाले. त्या काळी सोळा लाख रुपये खर्च झाले होते.

ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्याविषयीचे संदर्भ आढळतात. पूर्वी हा भाग जंगलाचा असल्याने भाविकांची वर्दळ कमी असायची. एकत्रित येत तीर्थयात्रा केली जायची. मुक्कामी पुरोहितांच्या वाड्यात राहावे लागत.

विसाव्या शतकात परिस्थितीमध्ये मोठे बदल झाले. लोकसंख्या वाढल्याने भाविक रात्रंदिवस त्र्यंबकेश्‍वरमध्ये येताहेत. तीर्थस्नान, दर्शन, पूजा-विधीसाठी वर्दळ वाढली. मात्र त्र्यंबकेश्‍वरनगरी ब्रह्मगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असल्याने विकासासाठी उपलब्ध जागेचा प्रश्‍न कायम आहे. प्रसाद योजनेतून विविध विकासकामे सुरू आहेत.

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Tribakeshwar Temple News
Nashik News :एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरला बहुमान; ‘ARIS’ परिषदेत गौरव

ज्योतिर्लिंग मंदिर विश्‍वस्त मंडळातर्फे दर्शन रांगा कायमस्वरूपी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाविकांना वातानुकूलित व्यवस्थेसह गर्भगृह दर्शनासाठी मोठ्या आकाराचे ‘स्क्रीन' लावण्यात आले आहेत. सर्वत्र विद्युत आणि मंदिर परिसरात दगडी कोटाचे काम सुरू आहे. मंदिर १९४० मध्ये केंद्रीय संरक्षित स्थळ म्हणून अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यामुळे इथे बदल करण्यात अडचणी येत असत.

पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेत अडचणीची कामे मार्गी लावली जात आहेत. देवस्थानच्या भाविकांच्या निवास व्यवस्था इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. यात्रेकरूंच्या निवासासाठी अद्ययावत व्यवस्था केली जात आहे. इमारतीच्या सभागृहात प्रसादव्यवस्था करण्यात येत आहे. कोठी हॉलच्या लाकडी तुटलेल्या भागाची दुरुस्ती आणि इमारतीच्या डागडुजीसह रंगकाम सुरू आहे. बालाजी, शिर्डी अशा देवस्थानांप्रमाणे मोठे उत्पन्न नसले, तरीही देणगीतून विकासकामे सुरू आहेत.

Tribakeshwar Temple News
Nashik News: सिंहस्थासाठी पूर्वीपेक्षा अधिक निधी मिळेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विश्‍वस्त मंडळातर्फे सुरू असलेली कामे

- दर्शनासाठी वातानुकूलित रांग व्यवस्था. त्यात बसण्याची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय. अद्ययावत प्रसाधनगृहे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र. दहा ते बारा कोटींचा खर्च

- मंदिराच्या सभोवताली हद्दीतील दगडी भिंत आणि स्वतंत्र विद्युतव्यवस्था

- शिवप्रसादालय या देवस्थानच्या इमारतीची डागडुजी व निवासव्यवस्था, प्रसादालय. खर्च तीन कोटींचा

- कोटी हॉलच्या डागडुजीचा खर्च दोन कोटी. मंदिरातील आरसे महाल दुरुस्ती व विद्युतीकरण

- सुरक्षेसाठी मंदिर परिसरात कॅमेऱ्यांची नजर

Tribakeshwar Temple News
Nashik News :एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरला बहुमान; ‘ARIS’ परिषदेत गौरव

गोदावरी काठी अन् सह्याद्रीच्या माथ्यावर

सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं

गोदावरितीरपवित्रदेशे।

यद्धर्शनात्पातकमाशु नाशं

प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे॥

द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमधील श्री त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाचा हा श्‍लोक आहे. अर्थात, गोदावरीच्या काठावरील पवित्र भूमीत सह्याद्रीच्या माथ्यावर स्थित असलेले, ज्याच्या दर्शनाने पाप नष्ट होते. मी त्या श्री त्र्यंबकेश्‍वराचे स्तवन करतो.

Tribakeshwar Temple News
Nashik News : सुदाम भागुजी सांगळे वकील यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.