Nashik News: चणकापूरचे पहिले आवर्तन 15 जानेवारीनंतर; 52 पाणीपुरवठा योजनांच्या गावांना मिळणार दिलासा

chankapur dam
chankapur damesakal
Updated on

Nashik News: तालुक्यासह कसमादे परिसरात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. चणकापूर धरणावर मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. दुष्काळी परिस्थिती असली, तरी यंदा चणकापूरसह विविध धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. सध्या चणकापूरमध्ये २ हजार ३५४ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. धरण ९७ टक्के भरले आहे.

मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावात ३८ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. हे पाणी महिनाभर पुरेल. इतर पाणीपुरवठा योजनांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे १५ जानेवारीनंतर चणकापूरचे पहिले आवर्तन सोडले जाण्याची शक्यता आहे. आवर्तनामुळे पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेल्या गावांना दिलासा मिळेल. (Chankapur dam first water supply is likely to be released after January 15 nashik news)

मालेगावला शहराला गिरणा व चणकापूर या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे येथे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचते. चणकापूर धरणातून गिरणा नदीद्वारे ठेंगोडा डावा कालव्यातून पाणी महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात येते. तेथून जलवाहिनीद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येते.

सद्यपरिस्थितीत ७० ते ७५ टक्के पाणी गिरणा धरणातून, तर २५ ते ३० टक्के पाणी तळवाडे तलावातून उचलले जात आहे. महापालिका हद्दीत ५४७ विभागाद्वारे दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरासह महापालिका हद्दीतील गावांना ५१ जलकुंभातून जलवाहिनीद्वारे पाणी वितरित केले जाते.

३१ जुलैपर्यंतचे नियोजन

उत्तर महाराष्ट्रात सर्वांत मोठे असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा ९ हजार ६४८ दशलक्ष घनफूट असून धरण ५२ टक्के भरले आहे. मालेगाव महापालिकेला पिण्यासाठी दरवर्षी साधारणपणे ९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असते. धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने आरक्षित पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत सहज पुरते.

मालेगाव शहर, दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजना आदींसह कसमादेतील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना चणकापूर धरण वरदान ठरले आहे. दरवर्षी पूर पाण्यामुळे फेब्रुवारीपर्यंत आवर्तनाची गरज भासत नव्हती. यंदा परतीचा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही.

chankapur dam
NMC News: महापालिका मुख्यालयात फेब्रुवारीत पुष्पोत्सव; अंदाजपत्रकात 50 लाखांची तरतूद

परिणामी, कमी साठवण क्षमता असलेल्या काही पाणीपुरवठा योजनांनी डिसेंबरमध्ये ताण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आवर्तनाची मागणी होऊ लागली आहे. चणकापूरचे पिण्यासाठीचे पहिले आवर्तन १५ जानेवारीपर्यंत सोडले जाण्याची शक्यता आहे. चणकापूरचे उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरेल अशा स्वरूपाचे नियोजन केले जाणार आहे.

६ महिने दोन दिवसांआड पाणी

मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावात महिनाभर सहज पुरेल एवढा जलसाठा आहे. गिरणा व चणकापूर धरणातील जलसाठा पाहता शहरासह हद्दवाढ भागातील गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा फारशा जाणवणार नाहीत. सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तो एक दिवसाआड करण्याची मागणी होत आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता, मालेगावकरांना किमान सहा महिने तरी दोन दिवसांआड पाणीपुरवठ्यावर समाधान मानावे लागेल.

सिंचनासाठी आवर्तनाची अपेक्षा

चणकापर धरणातून गेल्या चार वर्षांपासून कसमादेतील शेतीला सिंचनासाठी आवर्तन मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा व फळ शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चणकापूरमधून सिंचनासाठी आवर्तनाबाबत स्पष्टता झाली नाही. मालेगाव महापालिकेने गिरणा धरणातून अधिक पाणी उचलावे. तसेच उन्हाळ कांदा व फळ शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हरणबारी धरणातून सिंचनासाठी ३ आवर्तने मिळणार आहेत. चणकापूरमधून पिण्यासाठी व सिंचनासाठी संयुक्त आवर्तन मिळाल्यास उन्हाळ कांद्याचे उत्पादन वाढू शकेल. शेततळे व विहिरींचे पाणी कितपत पुरेल याबाबत साशंकता आहे. अनेक शेतकऱ्यांनी सिंचनासाठी आवर्तन मिळेल या अपेक्षेने उन्हाळ कांदा लागवडीला सुरवात केली आहे.

chankapur dam
Nashik News: शाळेत गुरुजींचे छायाचित्र लागलेत काय..! शिक्षण विभागाने मागवली माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()