Nashik News: चणकापूर शंभर टक्के भरले! मालेगाव शहरास 52 गावांचा पाणीप्रश्‍न सुसह्य

chankapur dam
chankapur damesakal
Updated on

मालेगाव : शहरासह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना फायदेशीर असलेले चणकापूर धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे. गेल्या महिन्यापासून धरणातील जलसाठा ९५ ते ९७ टक्क्यावर नियंत्रित करण्यात आला होता.

धरणातील विसर्ग गिरणा नदीपात्रात वेळोवेळी सोडण्यात आला. परतीच्या पावसाची चिन्हे दिसत नसल्याने धरण शंभर टक्के भरुन घेण्यात आले. धरण ओव्हरफ्लो झाल्याने मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. (Chankapur one hundred percent full Malegaon city can bear water problem of 52 villages Nashik News)

यावर्षी तालुक्यासह कसमादेत पाऊस रूसला. जून व जुलैमध्ये अधूनमधून रिमझिम पावसाने हजेरी लावली. ऑगस्ट पूर्ण कोरडा गेल्याने खरिपाची पिके वाया गेली. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध होते, अशा शेतकऱ्यांनी कशीतरी खरीपाची पिके वाचविली.

सप्टेंबरमध्ये सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे गिरणा व मोसम या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहिल्या. चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद ही चारही प्रमुख धरणातील जलसाठा झपाट्याने वाढला.

धरणांमधून विसर्ग वाढल्याने गिरणा व मोसमच्या पूरपाण्याने उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरणातील जलसाठा झपाट्याने वाढण्यास मदत झाली.

परतीच्या पावसाची चिन्हे दिसत नसल्याने चणकापूर शंभर टक्के भरून घेण्यात आले. कसमादेतील चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद ही चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. गिरणा धरणातील जलसाठा ५७ टक्के आहे.

माणिकपुंजमध्ये ३५ टक्के पाणीसाठा असून नाग्यासाक्या धरण पावसाळा संपत आला तरी देखील कोरडेठाक आहे. चणकापूर भरल्याने मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.

मालेगाव शहराला चणकापूर व गिरणा या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दाभाडीसह बारागाव याेजना व इतर पाणीपुरवठा योजनांनाही दिलासा मिळाला आहे.

chankapur dam
Water Scarcity: दिंडोरी तालुका अन् 11 मंडळांत पर्जन्याच्या सरासरीचे शतक! जिल्ह्यात सर्वत्र पाणीबाणीची स्थिती

धरण - उपलब्ध जलसाठा (दशलक्ष घनफुटात) - टक्केवारी

चणकापूर - २४०७ - १००

हरणबारी - ११६६ - १००

केळझर - ५७३ - १००

गिरणा - १०५१७ - ५७

पुनंद - १३०७ - १००

माणिकपूंज - ११७ - ३५

नाग्यासाक्या- ०० - ००

chankapur dam
Mumbai Water News: मुंबईकरांनो पाणी पितांना काळजी घ्या ; अन्यथा होऊ शकतो आरोग्याला धोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()