Nashik News : पहिल्या टप्प्यात 57 ठिकाणी चार्जिंग स्टेशन; 35 ठिकाणी निधी उपलब्ध होणार

Charging Station News
Charging Station Newsesakal
Updated on

नाशिक : हवा प्रदूषण करण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत महापालिकेकडून शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. दोन टप्पे तयार करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५७ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

यातही २२ जागांवर नवी दिल्लीच्या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत तर केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीनर पॉलिसी अंतर्गत ३५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. (Charging stations at Fifty Seven locations in first phase Funds available at thirty five location by municipal corporation nashik news)

Charging Station News
Nashik Crime News : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच

पारंपरिक इंधनावर होणारा खर्च त्यामुळे वाढणारी महागाई व वाहनांची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण अवलंबले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असताना तेवढ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशनचीदेखील आवश्यकता भासणार आहे.

त्याअनुषंगाने महत्त्वाच्या शहरांमध्ये केंद्र शासनाने चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी देण्याची तयारी केली आह. त्यानुसार महापालिकेकडून यादी मागवण्यात आली होती. नाशिक महापालिकेकडून २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी यादी सादर करण्यात आली, तर नॅशनल क्लीनर पॉलिसीअंतर्गत (एन कॅप) ३५ जागांवर चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Charging Station News
Nashik News : नायलॉन मांजत अडकलेल्या घुबडाची सुटका!

महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात ५७ जागा चार्जिंग स्टेशनसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ हे तत्त्व त्यासाठी अवलंबले जाणार असल्याची माहिती विद्युत व यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिली.

या ठिकाणी असेल चार्जिंग स्टेशन

महापालिका मुख्यालय, पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, नाशिक रोड व पंचवटी सहा विभागीय कार्यालय, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, बिटको रुग्णालय, महाकवी कालिदास कलामंदिर समोरील पार्किंग, उपनगर नाका, आरटीओ कॉलनी बोधलेनगर, लेखानगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी मार्केट, रामसृष्टी उद्यान, रामदास कॉलनी गार्डन, तपोवन बस डेपो, छत्रपती संभाजी राजे स्टेडिअम.

Charging Station News
Nashik News: वीजनिर्मितीत MVP होणार स्‍वयंपूर्ण; Solar Park किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍पाची चाचपणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.