नाशिकच्या शासकीय कार्यालयांमध्ये होणार चार्जिंग स्टेशन

महापालिकेचे विविध कार्यालयांना पत्र
charging station
charging stationsakal media
Updated on

नाशिक : महापालिकेतर्फे(nashik carporation) शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (eletric cars)बॅटरी चार्जिंगसाठी २० स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शासकीय कार्यालयांना चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन महापालिकेने पत्रान्वये केले आहे. एस. टी. महामंडळ, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद या शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशनसाठी(charging stations) जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.(Charging stations will be set up in government offices in Nashik)

राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ अन्वये प्रदूषणमुक्तीचे धोरण आखले आहे. या धोरणात १ एप्रिल २०२२ पासून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासन निधीतून बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शासकीय कामकाजासाठी भाडेतत्त्वावर घेतली जाणारी सर्व वाहने इलेक्ट्रीकच असणे बंधनकारक केले आहे. धोरण अंमलबजावणीसाठी महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रीक वाहनेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदीचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.

charging station
प्रीमियम शुल्कामुळे नाशिक महापालिकेला ११० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

इलेक्ट्रीक वाहनांची संख्या सध्या मर्यादित आहे. मात्र, भविष्यात वाहने वाढतील. त्यामुळे बॅटरी चार्जिंगचा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. त्यासाठी महापालिकेने २५ पेक्षा जास्त सदनिका असलेल्या निवासी इमारती व व्यावसायिक इमारतींसाठी बांधकाम परवानगी देताना इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनची अट घातली आहे. महापालिकेच्या जागांवर पीपीपी तत्त्वावर २० इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर आता महापालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालयांच्या आवारात इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय कार्यालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

charging station
नाशिक महापालिकेत नोकरीभरती करा

शहरातील पार्किंगवरही चार्जिंग स्टेशन

शहरात स्मार्टसिटी कंपनीतर्फे पार्किंग स्टेशन उभारले आहे. त्या पार्किंगच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. विभागीय अधिकारी व अभियंत्यांनी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनच्या जागांची पाहणी करावी व आराखडा तयार करावा. त्या जागांवर किती चार्जिंग स्टेशन उभारता येतील, एकावेळी किती वाहनांना व किती वेळात चार्जिंग करता येईल. याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.