Nashik News: अंत्यविधी, दफनविधीचा खर्च करण्याचा चाटोरी ग्रामपंचायतीचा निर्णय

माणसाच्या आयुष्याचा खरा प्रवास घरापासून ते स्मशानापर्यंत एवढाच. मात्र स्मशानातील प्रवासासाठी श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत सर्वांनाच खर्च करावा लागतो.
Chatori Gram Panchayat decision to spend on funeral burial nashik news
Chatori Gram Panchayat decision to spend on funeral burial nashik news
Updated on

Nashik News: माणसाच्या आयुष्याचा खरा प्रवास घरापासून ते स्मशानापर्यंत एवढाच. मात्र स्मशानातील प्रवासासाठी श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत सर्वांनाच खर्च करावा लागतो.

ऐनवेळी करावा लागणारा हा खर्च आणि होणारी गैरसोय टाळण्यासाठी निफाड तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून, १ डिसेंबर २०२३ वर्षांपासून अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. (Chatori Gram Panchayat decision to spend on funeral burial nashik news)

सामाजिक बांधिलकी जोपासणारा या ग्रामपंचायतींचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरणारा आहे. गावगाडा म्हटले की, त्यात अनेक जाती आणि धर्मांच्या लोक येतात. त्यातच अलीकडे राजकारणाचे बदलते स्वरूप पाहता गावागावांत गटातटाच्या अभेद्य भिंती असतात. एक गट सत्तेत, तर दुसरा गट विरोधात असतो.

गावपातळीवर अनेकदा राजकीय कुरघोड्याही होतात. सत्तेत आल्यानंतर काही गावे विकासाचा वसा जोपासतात, तर काही गावात विकासाचे स्वप्नच राहते. केवळ विकास करून नव्हे, तर लोकांच्या वैयक्तिक सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायती आणि तेथील कारभारी विरळच. मात्र लोकांच्या सुखाबरोबरच दुःखाचे सांगाती होण्यासाठी चाटोरी ग्रामपंचायतीने समाजाभिमुख उपक्रम सुरू केला.

Chatori Gram Panchayat decision to spend on funeral burial nashik news
Grapes Crisis: द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; मजुरांची टंचाई

चाटोरी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची गैरसोय आणि आर्थिक कुचंबणा टाळण्यासाठी अंत्यविधीचे साहित्य मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वांना अंत्यविधीच्या साहित्याची मोफत सोय करून देत एक आदर्श निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत अनिता कदम यांनी सूचना याबाबत सूचना माडंली. बाळासाहेब हिरे यांनी अनुमोदन दिले.

सरपंच अरुणा हांडगे, उपसरपंच बाळासाहेब हिरे, ग्रामसेविका एस. जी. सनेर, सदस्य अनिता कदम, जिजाबाई खेलूकर, शोभा घोलप, सारिका हांडगे, द्रौपदाबाई भोईर, सविता डमाळे, भाऊसाहेब घोलप, राहुल गायकवाड, समाधान खेलूकर, लक्ष्मण धोंगडे, भाऊसाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.

Chatori Gram Panchayat decision to spend on funeral burial nashik news
Wedding Season: तुलसी विवाहानंतर आता लग्नसोहळ्यांचा धूमधडाका; वधू-वर संशोधन मोहिमेस वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.