Chhagan Bhujbal : बैठकी सतत होत असतात; पण माझ्यासाठी मतदार महत्त्वाचे आहेत. त्यांना भेटण्यास प्राधान्य दिले आहे, असे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. १४) स्पष्ट केले.
श्री. भुजबळ मंत्री झाल्यानंतर नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे.
त्याचवेळी श्री. भुजबळ येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे श्री. भुजबळ काय बोलणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. (Chhagan Bhujbal arrived nashik ozar airport nashik political)
मुंबईहून विमानाने श्री. भुजबळ यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जानोरीच्या ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर,
आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, विष्णुपंत म्हैसधुणे, गोरख बोडके, उषा बच्छाव, डॉ. योगेश गोसावी, संजय खैरनार, सुरेश खोडे, गणेश तिडके आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की शक्तिप्रदर्शन कुणासाठी आणि कशाला करायचे? हा प्रश्न आहे. येवल्याला बरेच दिवस गेलो नव्हतो. शपथविधीनंतर नाशिकला आलो. आता विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यावर परत येवल्याला जाता येणार नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती, मी येवल्याला यावे. त्याप्रमाणे निघालो आहे. तसेच माझ्या कामाचा आढावा प्रत्येक मतदाराला माहिती आहे. थोडीफार उजळणी मात्र होत राहते.
उपमुख्यमंत्र्यांच्या २३ जुलैच्या सभेचा विचार
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या येवल्यातील सभेला उत्तर देण्यासाठी मी जात नाही, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येत्या २३ जुलैला येवल्यात सभा घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली.
आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेतील. नोटीस देऊन ते सगळ्यांचे म्हणणे ऐकत आहेत, असेही श्री. भुजबळ यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.