सरस्वती प्रतिमा काढा नव्हे, तर शिक्षण देणाऱ्यांची करावी पूजा!: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal Newsesakal
Updated on

नाशिक : मी हिंदू आहे. मी कुलदेवता, सप्तशृंग मातेच्या दर्शनाला जातो, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या मुंबईतील कार्यक्रमातील सरस्वती पूजनाविषयी व्यक्त केलेल्या मताविषयी उठलेल्या राजकीय वादंगाविषयी भूमिका स्पष्ट केली.

सरस्वतीची प्रतिमा काढा, देवीचा अवमान होईल असे अथवा अपमानकारक बोललो नाही. उलटपक्षी बहुजन समाज, मुलींना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या आपल्या महापुरुष रुपी देवतांची पूजा करा, असे सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले. (Chhagan Bhujbal controversial statement over saraswati devi idol case nashik Latest Marathi News)

Chhagan Bhujbal News
HSC Exam : 12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरवात

भुजबळ फार्ममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. भुजबळ यांनी आपल्या बोलण्याविषयी राजकीयकरण का केले जाते? असा मला प्रश्‍न पडल्याचे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमा शेख, महर्षी कर्वे या महापुरुषांच्या पूजेला तुमचा विरोध आहे का? असा प्रश्‍न श्री. भुजबळ यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, की शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपण सरस्वतीचे पूजन करतो. मात्र फुले, शाहू, आंबेडकर अशा महापुरुषांना बाजूला ठेवणे योग्य नाही. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी बोलत होतो. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापनेच्या दीडशेव्या वर्षानिमित्तचा कार्यक्रम होता.

त्यामुळे तुम्हाला पूजा करायची त्यांची पूजा करायला हरकत असण्याचे कारण नाही. घरात आपल्या कुठल्या देवाची पूजा करायची हा तुमचा प्रश्‍न आहे. पण फुले, शाहू, आंबेडकर यांनी अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेऊ नका, असे सांगितले आहे.

Chhagan Bhujbal News
Adimaya- Adishakti : एकमेव वीर आसनातील बैठकीतील सांडव्यावरची देवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()