नाशिक : पालकमंत्री व राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाषणातून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना काढलेले शाब्दिक चिमटे चर्चेचे ठरले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी जलनेती क्रिया स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याला अनुसरून कोरोनामुळे अडचणीत आलेल्या लोकांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने नाकातून पाणी काढणारी जलनेती काय करणार, असा सवाल भुजबळ यांनी करताच सभागृहात हास्य उमटले. नाशिक शहर बससेवेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी (ता.८) अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते (chhagan-bhujbal-criticized-bjp-leaders-nashik-marathi-news)
भुजबळांच्या चिमट्यांनी भाजप नेत्यांना ठसके
अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाने नाशिककरांच्या एका डोळ्यात आसू, तर डॉ. भारती पवार यांना मंत्रिपद मिळाल्याने दुसऱ्या डोळ्यात हसू असल्याचा उल्लेख करताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता दोन मंत्रिपदे असल्याने मला दुहेरी आनंद झाल्याचा उल्लेख केला. आरोग्यमंत्रिपद मिळाल्याने आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास मदत मिळू शकते. रेमडेसिव्हिर व म्युकरमायकोसिस आजारावरील औषधांसाठी मीदेखील आता हक्काने फोन करू शकतो, असा चिमटा काढला. फडणवीस यांनी सीएनजी, इथेनॉल इंधनाचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यावर डिझेलच्या किमती वाढल्याने फडणवीस यांच्या सल्ल्याचा विचार करण्याचे आवाहन करताच सभागृहात पुन्हा हास्य उमटले.
माझ्या दारासमोर बस आलीच पाहिजे,’ ही भूमिका स्वीकारता कामा नये,
जगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही. नाशिककरांना सक्षम व फायदेशीर सेवा द्यायची असेल तर नगरसेवकांनी ‘माझ्या दारासमोर बस आलीच पाहिजे,’ ही भूमिका स्वीकारता कामा नये, आधुनिक सुविधांचा स्वीकार करताना नाशिककरांनीदेखील जबाबदारीचे भान ठेवावे, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. ते म्हणाले, की जगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फायद्यात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक महापालिकेच्या बससेवेलादेखील ३५ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा येणार असल्याचा अंदाज आहे. तो तोटा सहन करण्याची शक्ती महापालिकेने ठेवावी. बससेवा चालविताना फायद्यापेक्षा सुविधेचा विचार व्हायला पाहिजे. सेवा दिली तरच सेवेवरचा विश्वास वाढेल. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास यश नक्कीच मिळेल. स्वस्त वाहतूक व प्रदूषणमुक्ततेचा हेतू साध्य झाला पाहिजे. नाशिकचा विकास हाच एकमेव अजेंडा सर्वांचा असावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमुळे पायाभूत सुविधा वाढणार आहेत. त्यामुळे आधुनिक सुविधांचा स्वीकार करताना नाशिककरांनीदेखील जबाबदारीचे भान ठेवावे. नाशिकचा विकास होत असताना धूर ओकणारे कारखाने नको, त्याऐवजी एज्युकेशन, मेडिकल, वायनरी हब, शेतीवर आधारित उद्योग हवेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.