नाशिक जिल्ह्यातील निर्बंध तूर्तास 'जैसे थे' : छगन भुजबळ

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

नाशिक : कोरोनाचा संर्सगदर दोन टक्केच्या आत असल्याने दुकानांच्या वेळा वाढविण्यासह दोन दिवसांचा विकेंड लॉकडाउन (weekend Lockdown) एक दिवस कमी करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे यापूर्वीच टास्क फोर्सला पाठविला आहे. मात्र निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय राज्य टास्क फोर्स घेणार असल्याचे तूर्तास तरी जिल्ह्यात जैसे थे परिस्थिती राहणार असल्याची माहीती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (chhagan bhujbal informed that corona restrictions in nashik district will remain same)



जिल्हाधिकारी कार्यालयात भुजबळ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जि.प. मुख्य कार्यकारी आधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आदीसह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाचा संर्सग दर दोन टक्केच्या आत आहे. कोरोना उपचार घेणाऱ्यांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे दपारी चार पर्यतच्या दुकानाच्या वेळा वाढवून द्याव्यात. शनिवार व रविवार अशा दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाउनपैकी एक दिवस कमी करावा आदी व्यवसायीकांच्या मागण्या आहेत.त्यासाठी प्रस्तावही जिल्हा प्रशासनाने राज्य टास्क फोर्सकडे पाठविला आहे. मात्र अद्याप त्याविषयीचा निर्णय राज्य टास्क फोर्सकडून जाहीर झालेला नाही. हा निर्णय राज्य टास्क फोर्सकडूनच घेतला जाणार आहे.

chhagan bhujbal
नाशिक : अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे लढवणार मनपा निवडणूक



पाणीकपातीचा निर्णय महापालिकेचा

शहरात पावसाचा जोर वाढला असून धरण ७५ टक्केवर भरले आहे. त्यामुळे शहरातील पाणी कपातीबाबत महापालिकेने निर्णय घ्यायचा आहे. सध्या नाशिक शहरात आठवड्यात एक दिवस दर बुधवारी पाणी बंद ठेवले जाते. याविषयी पालकमंत्री म्हणून मी निर्णय घेण्यापेक्षा तो निर्णय महापालिकेने घेतला पाहिजे. असेही भुजबळ यांनी सांगितले.


सात शाळा पुन्हा बंद

जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण नसलेल्या गावांमध्ये शाळा सुरु करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार ग्रामीण भागात दोन आठवड्यापासून कोरोना रुग्ण नसलेल्या गावात शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र निफाड, देवळा, सिन्नर भागातील सुमारे ७ ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्याना कोरोना झाल्याचे लक्षात आल्याने सात शाळा पून्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जि.प.च्या मुख्य कार्यकारी आधिकारी लिना बनसोड यांनी सांगितले.

chhagan bhujbal informed that corona restrictions in nashik district will remain same)

chhagan bhujbal
नाशिक शहर बससेवेची धाव आता ओझर, सिन्नरपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.