नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिम सुरु

Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalGoogle
Updated on

नाशिक : आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालवितांना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज जिल्ह्यात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सदभावना पोलीस पेट्रोल पंप, गंगापूर रोड येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिम शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले- श्रींगी यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पेट्रोल डिलर संघटनेचे अधिकारी आदि उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
नाशिक : शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शहरात ७८२ अपघातात ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. अशा अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा

‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा उपक्रम स्तुत्य असून, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांचा जीव वाचविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. नागरीकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, अशी भावना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षत घेवून, सर्व पेट्रोल पंपावर सीसीटिव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना देखील यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू: पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय नागरीकांच्या हितासाठी शासन योजना व मोहिम राबवित असते. त्या अनुषंगानेच जिल्ह्यात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप व शहर पोलिस यांच्या संमतीने पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचे प्राधन्य देण्यात येणार असून, ही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू, असा विश्वास पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात व्यक्त केला आहे.|

Chhagan Bhujbal
नाशिकमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच डेंगीचे शेकडो रुग्ण

पालकमंत्र्यांनी भरलं पेट्रोल

या मोहिमेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 2 हजार 53 हेल्मेट उपलब्ध करण्यात आले असून, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उपस्थित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाची आमदार सरोज अहिरे व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेट घालुन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आपल्या गाडीत पेट्रोल भरून सुरूवात केली आहे. यावेळी हेल्मेट न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यु झालेल्या नागरीकांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करून, हेल्मेट वापरण्याचे आवाहन शहरातील सर्व नागरीकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.