भुजबळ म्हणाले, 'आम्ही महाविकास आघाडीचे, आमचं आम्ही पाहून घेऊ'

Chhagan Bhujbal and Sena MLA Suhas Kande
Chhagan Bhujbal and Sena MLA Suhas KandeTeam eSakal
Updated on

नाशिक : जिल्हा नियोजन समितीतील निधी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वळविल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी आज मात्र त्याविषयी चकार काढला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला कांदे आले असता, त्यांना पत्रकारांशी विचारले असता, सोयीस्कररित्या बगल देत त्यांनी याप्रश्नी मौन पाळले तर स्वता भुजबळ यांनी आम्ही महाविकास आघाडी घटक पक्षात किचकट विषय सोडविण्यासाठी उच्च स्तर समिती असून आम्ही आमचे पाहून घेऊ असे सांगत याविषयाला बगल दिली.



जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वाटपावरुन काही दिवसांपासून पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात शीतयुध्द सुरु आहे. या महिणाभरात नांदगावला दोनदा पूर आल्याने त्या भागातील व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर निधी वाटपाचा विषय ऐरणीवर आला. दोन आठवड्यापासून सुरु असलेली धुम्मस आज दिसली मात्र त्याविषयी भाष्य करणे दोघांनी टाळले.

पूरात पॅचअप गेले वाहून

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे नांदगाव मतदार संघात लोकप्रतिनिधी आहे. तर भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे कांदे यांचे राजकिय विरोधी उमेदवार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ पालकमंत्री झाले. तर कांदे यांना महाविकास आघाडीचे नेते असलेल्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागत आहे. मतदार संघात परस्परांचे विरोधक असलेल्या या दोन्ही नेत्यांना मतदार संघातील पूरानंतरच्या स्थितीत कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा आपत्कालीन निधी हा वादाचा मुद्दा ठरला आहे. नांदगावला पूरग्रस्तांना आपत्कालीन निधीतून मदत द्यावी ही कांदे यांची मागणी आहे. तर असा निधी नाही. राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू तेथून निधी आल्यावर पाहू असे पालकमंत्री भुजबळ यांचे म्हणणे आहे. या मुद्यावरुन महिण्यापासून त्यांच्यात वातावरण पेटले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दोन्ही नेत्यात पॅचअप करण्याचा प्रयत्नही केला. मात्र नांदगावला आलेल्या दुसऱ्या पूरात हे पॅचअप निघून गेले.

Chhagan Bhujbal and Sena MLA Suhas Kande
जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहन



कांदे मौनात

नांदगाव मतदार संघात पालकमंत्री भुजबळ यांच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीचा निधी वळविल्याचा आरोप करणारे सुहास कांदे आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला आल्यानंतर त्यांना विचारले असता, श्री कांदे यांनी सपशेल मौन धारण केले.


आमचं आम्ही पाहू

महाविकास आघाडीत पर्क्षांतगत मतभेदाचे विषयावर मार्ग काढण्यासाठी उच्च स्तरावर यंत्रणा आहे. कांदे यांनी नांदगाव मतदार संघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधीची मागणी केली आहे. ते आमच्या घटक पक्षातील आमदार आहेत. त्यांनी तक्रारी नव्हे तर मागण्या केल्या आहे.त्याविषयी आमचं आम्ही पाहून घेऊ.
- छगन भुजबळ (पालकमंत्री नाशिक)

Chhagan Bhujbal and Sena MLA Suhas Kande
नाशिक : उन्हाळ कांद्याच्या भावात पाचशे रुपयांची उसळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.