इगतपुरी : ओबीसींच्या व्यासपीठावरुन जालन्यात छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच चिथावणीखोर भाषण केलं होतं. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळांच्या भाषणावर संताप व्यक्त करत सरकारनं त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणी केली होती.
त्यांच्या या भूमिकेला आज भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इगतपुरी इथं ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. (Chhagan Bhujbal reply to Sambhaji Chhatrapati who criticizes over Jalna Rally)
छगन भुजबळ म्हणाले, "संभाजीराजे काल म्हणाले की भुजबळ दोन समाजात वितुष्ट निर्माण करत आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे आम्ही तुमचा आदर सन्मान करतो कारण आमच्या हृदयात असलेले शाहू महाराज ज्यांनी मागासवर्गीयांना वरती आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते. आम्ही फुले-शाहू-आंबेडकर म्हणतो ना ते शाहू महाराज आहेत" (Latest Marathi News)
त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही तिकडे आहात, तुम्ही एका समाजाचे नाहीत. या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊ कसे बोलता? एकतर तुम्ही या आरक्षणाच्या आंदोलनात यायलाच नकोत. आलात तर तुम्ही सांगायला पाहिजे की तुम्ही सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा. कोणावरही अन्याय करु नका. ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे, अशा शब्दांत भुजबळांनी संभाजीराजेंना आवाहन केलं. (Marathi Tajya Batmya)
माझ्यावर आरोप करण्यापेक्षा घरदारं कोणी जाळली मी जाळी का? असा सवाल करताना दोन महिने जे काही राज्यात चाललं आहे त्यावेळी तुम्ही गप्प बसलात. तुमचं काम होतं की असं करु नका. तुम्ही स्वतः जायला पाहिजे होतं बीडला. लोकांची घरं जाळण्यात आली, पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले सगळीकडे.
तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला पाहिजे होते ते तुमचं काम नाही का? एक लक्षात ठेवा छगन भुजबळांना मंत्रीपदाची पर्वा नाही आणि आमदारकीची पण पर्वा नाही. तो लढेल गोरगरीबांसाठी लढेल. छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता त्यामुळं सर्वांना न्याय द्या, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या.
प्रकाश आंबेडकरांना देखील माझी विनंती आहे की, त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आम्हाला सांगा ना आम्ही कुठे चुकलो? राज्यात काय चाललं आहे ते आम्हाला सांगा. त्याच्यावर विचार करा, आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, दूर ढकलण्याची नाही. राज्यातील जे वेगवेगळे पक्ष असतील, समाज असतील किंवा विविध पदांवर काम करणारे लोक असतील त्यांच्याकडून माझी हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचं सुद्धा ऐकून घ्याव. मग आम्हाला सांगा आमच चुकलं कुठे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.