स्मार्टसिटीचे अधिक चांगले काम अपेक्षित - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalgoogle
Updated on

नाशिक : स्मार्टसिटीच्या कामात मी अधिक लक्ष घातले नाही; पण अपेक्षित काम झाले नाही. अधिक चांगले काम करू शकलो असतो, अशा शब्दांमध्ये स्मार्टसिटीच्या कामकाजाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी आळवली आहे. तसेच बससेवा महापालिकेने स्वतःकडे घेण्यास आपला विरोध होता आणि आहे, असे सांगून त्यांनी बससेवा परवडणारी असेल आणि महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नसल्यास अभिनंदनीय आहे, असेही स्पष्ट केले. (chhagan bhujbal said that we could have done a better job of smart city)


पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, की जगात कुठलीही बससेवा फायद्यात नाही. मुंबईतील बससेवेला इलेक्ट्रिक कंपनी जोडण्यात आली होती. बससेवा ही जनतेची सेवा आहे. त्याचा बोजा नाशिक महापालिकेवर पडणार आहे. हा बोजा परवडणार का? हा खरा प्रश्‍न आहे.


भाजपची अवस्था ‘जलबिना मछली’

भारतीय जनता पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. या पक्षाची अवस्था ‘जलबिना मछली’, अशी झाली आहे, असे टीकास्त्र श्री. भुजबळ यांनी सोडले. जरंडेश्‍वर साखर मिलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनी असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. त्याअनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, की दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा कार्यक्रम केला जातो. हे देशभर चाललंय. सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. त्याबद्दल सर्व राजकीय पक्ष बोलताहेत. तरीही थांबायला तयार नाही.

(chhagan bhujbal said that we could have done a better job of smart city)

Chhagan Bhujbal
नाशिक जिल्ह्यात २३८ रुग्‍णांची कोरोनावर मात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.