Nashik News : राज्यावर (State) वाढत असलेला कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींहून अधिक असताना प्रत्यक्ष वास्तवाचा विचार केला नाही. (chhagan bhujbal statement about budget presented nashik news)
तसेच राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये बसलेला फटका बघता, राज्यातील जनतेला खूष करण्याच्यादृष्टीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजीचा अर्थसंकल्प सादर झाला, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. तसेच नाशिकला मेट्रो का नको? असा प्रश्न उपस्थित केला.
नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग, नाशिक निओ मेट्रो प्रकल्प यासाठी निधी देण्यात येईल. पण किती निधी उपलब्ध करून देण्यात येईल याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही.
इतर शहरांमध्ये मेट्रो आणि नाशिकची समजूत ‘टायर बेस निओ मेट्रो‘ देऊन का काढली? बस जाणारा ‘फ्लायओव्हर’ असा त्याचा अर्थ मानायचा काय? असे प्रश्न उपस्थित करत श्री. भुजबळ म्हणाले, की दमणगंगा-पिंजाळ, नार-पार आदी नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून करू अशी घोषणा केली.
मात्र कुठल्याच निधीची तरतूद केलेली दिसत नाही. निव्वळ अनेक घोषणा करून जनतेला दिवसा स्वप्न दाखविण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.
मुळात ज्यांनी सत्तेवर येताच जनतेच्या हिताची कामे स्थगिती करण्याचा निर्णय घेतला. अद्याप त्यातील अनेक कामे स्थगित आहेत. त्यांच्या तोंडून अनेक योजनांची घोषणा होतेय.
यावर जनता किती विश्वास ठेवेल ही शंका आहे. शिवाय मोठ्या रस्त्यांबद्दल भाष्य केले, मात्र जिल्हा आणि तालुकास्तरावरील जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग रस्त्यांनी दुर्दशा कधी संपणार? त्याचप्रमाणे बेरोजगारी कमी करायची असेल, तर जोपर्यंत मोठे उद्योग येणार नाही, तोपर्यंत रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
सरकारचे आभार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओबीसींसाठी स्वतंत्र घरकूल योजनेची आमची मागणी होती. अर्थसंकल्पात ओबीसींसाठी घरकूल योजनेची घोषणा केली, मात्र त्याला मोदी आवास घरकुल योजना असे नाव देण्यात आले.
ओबीसी महामंडळाला एक रुपयाची तरतूद नाही. स्वाधार आणि स्वयंच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची घोषणा होईल, असे वाटत होते.
पण ओबीसींचा भ्रमनिरास केला, असे सांगत श्री. भुजबळ यांनी सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, की सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.
या शाळेच्या जागेचा विकास करून याठिकाणी आद्य मुलींची शाळा सुरु करावी व स्मारक विकसित करावे अशी आमची सातत्याने मागणी होती. याबाबत हे स्मारक विकसित करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची सुबुद्धी सरकारला झाली.
हे तर फसवे ‘बजेट'
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणांचा अवकाळी पाऊस पाडण्याचा प्रयत्न राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केला असून हे फसवे ‘बजेट' आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, की नाशिकसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी निधी देऊ अशी घोषणा केली.
मात्र त्यासाठी कुठलीही तरतूद दिसत नाही. नाशिकला मेट्रोची गरज असताना नाशिक निओ मेट्रोवर नाशिकची बोळवण केली.याही प्रकल्पासाठी निव्वळ घोषणा केली.
त्यासाठी किती निधी देणार यात स्पष्टता नाही. एकंदरीत काय तर नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.