नाशिक : आरक्षण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी देश आणि राज्यातही जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आहे. ओबीसींमधील सर्व घटकांनी एकत्र येऊन ही मागणी कायम ठेवावी. ओबीसी समाजातील सर्व घटक एकत्र राहिल्याने सर्व हक्क मिळवू शकतात, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal statement about OBC nashik news)
शेवंता लॉन्समध्ये लोणारी समाज सेवा संघाचा राज्यस्तरीय परिचय मेळावा झाला. समाजातील केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे, शोभा मगर, भोलानाथ लोणारी, राजेंद्र लोणारी, रवींद्र धंगेकर, हरिभाऊ कुऱ्हे, संजय कुऱ्हे, वसंतराव घुले, दीपक लोणारी, डॉ. प्रवीण बुल्हे, देभास्करराव जहाड आदी उपस्थित होते.
या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, की बिहार राज्यात नुकतीच जातीनिहाय जनगणना सुरू केली आहे. आपल्या राज्यात आणि देशात ही जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. तसेच लोणारी समाज हा कोळसा,चुना, मीठ अशा गोष्टींशी निगडित असणारा व अशा गोष्टी तयार करून आपली रोजीरोटी चालवणारा समाज म्हणजे लोणारी.
समाजाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. समाजाचा उल्लेख महाभारतात आढळतो. शिवाय लोणारी समाज हा बहुजन समाजाचा एक घटक आहे. समाजाचे महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.