Chhagan Bhujbal : पोलिसांनी दुर्लक्ष केले असेल तर त्याचा जाब त्यांनी द्यावा : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

Chhagan Bhujbal : मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये कोट्यवधींचा अमली पदार्थांचा साठा पकडला. स्थानिक पोलिसांना याची कल्पना नव्हती. या प्रकरणी नाशिकच्या पोलिसांनी दुर्लक्ष केले असेल तर त्याचा जाब त्यांना द्यावा लागेल, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. ७) येथे सांगितले. (chhagan bhujbal statement about police on drug case nashik news)

भुजबळ हे मुंबईहून राजधानी एक्स्प्रेसने नाशिक रोड रेल्वेस्थानकात दाखल झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे ९० टक्के लोकप्रतिनिधी आहेत. नागालँड व झारखंडचे लोकप्रतिनिधी धरले तर त्यापेक्षा अधिक लोकप्रतिनिधी आमच्याकडे आहेत.

त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. ते म्हणाले, की शरद पवार यांनी न्यायालयात जाणार नाही, असे वक्तव्य केले होते.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी 7 आमदारांमुळे राष्ट्रवादीचा ‘क्लेम' : छगन भुजबळ

आता मात्र ते न्यायालयात गेले. ते न्यायालयात जाणे स्वाभाविक आहे. ‘राष्ट्रवादी’चे दोन्ही गट आयोगासमोर आपली बाजू मांडतील. आयोग योग्य तो निर्णय घेईल.

त्यांच्या आणि आमच्या कागदपत्रांची शहानिशा होईल. चिन्ह गोठविले तर नवीन चिन्ह मिळेल. शरद पवार पक्षात मनमानी करीत असल्याबाबत आयोगासमोर मत मांडण्यात आले होते. त्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगून भुजबळ म्हणाले, की गेल्या काही वर्षांत पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. मात्र, त्या नियमाला धरून झाल्या नाहीत.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : 'इतके' आमदार निवडून आणा मगच अजित पवार मुख्यमंत्री होतील; भुजबळांनी थेटच सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.